ऑलिम्पिकच्या स्थगीतीने नरसिंगला ऑलिम्पिक पात्रतेची संधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

रिओ ऑलिम्पिकच्या आधी करण्याच आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग दोषी आढळला होता, 2016 मध्ये त्याच्यावर चार वर्ष बंदी घालण्यात आली होती.

कोरोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगताला बसला आहे, जगभरातील सगळ्या क्रीडा स्पर्धा रद्द केल्या जात आहेत. या वर्षी नियोजित असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा देखील स्थगीत करण्यात आल्या आहेत. पण ऑलिम्पिक स्थगीत करण्याचा निर्णय भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या करिअरसाठी नवसंजीवनी देणारा ठरु शकतो.

जूलै महिन्याच्या अखेरीस नरसिंगवर डोपींग प्रकरणात घालण्यात आलेली चार वर्षांची बंदीची शिक्षा संपणार आहे, जर ऑलिम्पिक स्पर्धा वेळेत पार पडल्या असत्या तर तो या स्पर्धांना मुकणार होता. पण आता ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे नरसींग 74 वजनी गटात ऑलिम्पिक कुस्तीच्या पत्राता फेरीत भाग घेऊ शकतो. 

रिओ ऑलिम्पिकच्या आधी करण्याच आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग दोषी आढळला होता, 2016 मध्ये त्याच्यावर चार वर्ष बंदी घालण्यात आली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांना जर नरसींग आमच्यकडे आला आणि खेळण्यात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याळा रोखू शकत नाही, त्याची शिक्षा पुर्ण झाली आहे त्यामुळे तो पुन्हा खेळू शकतो. 

जागतीक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मीळवुन नरसींगने रियो ऑलिम्पिकसाठी जागा निश्चीत केली होती. पण साममन्याच्या काही तास आधी त्याच्यावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. आता नरसिंगकडे परत एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी चालून आली आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या