'धाकड गर्ल' गीता फोगटच्या घरी आलाय छोटा 'सांता'!

टीम ई-सकाळ
Wednesday, 25 December 2019

2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू गीता फोगटने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या फोगट भगिनी आपल्या सगळ्यांना माहित झाल्या त्या 'दंगल' या चित्रपटामुळे. यामध्ये गीता आणि बबिता या फोगट भगिनींचा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये चँम्पियन होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या फोगट भगिनींपैकी एक असलेल्या गीता फोगटच्या घरी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका छोट्या सांताचे आगमन झाले आहे. गीता फोगट ही आई बनली असून तिने मंगळवारी (ता.24) एका मुलाला जन्म दिला. याबाबचे वृत्त स्वत: गीताने सोशल मीडियाद्वारे दिले. गीताने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो अपलोड करत ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिली. या फोटोत गीता, तिचा पती पवन कुमार आणि त्यांचे बाळ दिसत आहे. 

- Christmas 2019 : जेव्हा जवान 'जिंगलबेल जिंगलबेल' गाणं म्हणतात... (Video)

या पोस्टमध्ये गीताने लिहलंय की, ''बाळा, या जगात तुझे स्वागत. मी हा आनंदाचा क्षण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तुम्ही त्याला प्रेम आणि आशीर्वाद द्या. त्याच्या येण्याने आमचे जीवन आता 'परफेक्ट' झालंय.''

- संघातील स्थानही पक्क नाही तरीही यानं घेतल्या दशकात सर्वाधिक विकेट्स

2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू गीता फोगटने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. याशिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही दोन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. गीता, तिची बहिण बबिता आणि वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटानंतर फोगट भगिनी देशातील घरोघरी पोहोचल्या आहेत.

- पाक क्रिकेटपटूंना अख्तरचा सल्ला, 'त्या विराटकडून शिका जरा'


​ ​

संबंधित बातम्या