फुटबॉल वर्ल्ड कपच्या उद्घाटनाला भारताचे जगज्जेतेही जाणार; धोनी, कपिलला खास आमंत्रण

वृत्तसंस्था
Monday, 18 February 2019

फिफा वर्ल्डकप 2022 या कतारमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ पात्र ठरलेला नसल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी होता होणार नाही. मात्र, भारताला 1983 आणि 2011मध्ये क्रिकेट विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या दोन्ही संघांना या वर्ल्डकपसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. 

फिफा वर्ल्डकप 2022 या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी भारताला 1983 आणि 2011 मध्ये विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या संघाना या स्पर्धेसाठी आमंत्रित केले आहे. त्यांनी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. 

फुटबॉल विश्वकरंक हा आनंदोत्सव असून तो सगळ्यांनी एकत्रिपणे साजरा करायला हवा. 1983 आणि 2011 या दोन्ही विश्वकरंडकांमध्ये भारताने विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे मी स्वतः यांना आमंत्रित केले आहे, असे मत खाटेर यांनी स्पष्ट केले. 

​ ​

संबंधित बातम्या