हमारी छोरीया मेस्सी, रोनाल्डो से कम है के? बघा हा गोल आणि सांगा!

वृत्तसंस्था
Monday, 25 March 2019

भारतीय महिला संघाने अपेक्षेनुसार सॅफ फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता सहज पूर्ण केली. ही पाचवी स्पर्धा होती. भारताने पाचही स्पर्धा जिंकल्या आहेत. बिराटनगर (नेपाळ) येथील निर्णायक लढतीत भारताने नेपाळचा 3-1 असा सहज पाडाव केला. 

मुंबई : भारतीय महिला संघाने अपेक्षेनुसार सॅफ फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता सहज पूर्ण केली. ही पाचवी स्पर्धा होती. भारताने पाचही स्पर्धा जिंकल्या आहेत. बिराटनगर (नेपाळ) येथील निर्णायक लढतीत भारताने नेपाळचा 3-1 असा सहज पाडाव केला. 

भारताने या स्पर्धेतील आपल्या 23 पैकी एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या स्पर्धेत चार सामन्यांत भारताने 18 गोल करीत आपली हुकमत सिद्ध केली. शहीद रंगशाळा स्टेडियमवरील निर्णायक लढतीत चाहत्यांचा पूर्णपणे पाठिंबा यजमान नेपाळलाच होता; पण त्याचा कोणताही परिणाम भारताच्या खेळावर झाला नाही. दालिमा छिब्बेर, ग्रेस दांगमेई आणि बदली खेळाडू अंजू तामांग यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताचा विजय निश्‍चित केला. 

भारताच्या आक्रमणांना रोखण्यासाठी नेपाळने प्रतिआक्रमणावर भर दिला; पण भारताचा बचाव सरस असल्याने त्यांना अनेकदा गोलचे प्रयत्न गोलपोस्टपासून जास्त अंतरावरून करावे लागले. त्यानंतरही नेपाळने हार मानली नाही. त्यांनी विश्रांतीस गोलफलक 1-1 बरोबरीत ठेवला होता. उत्तरार्धाच्या सुरवातीस नेपाळ जास्तच आक्रमक झाले. भारताने ती आक्रमणे विफल ठरवताना चांगली प्रतिआक्रमणे रचली. त्यातच आघाडी घेत विजयही निश्‍चित केला. 


​ ​

संबंधित बातम्या