10 वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट अखेर विवाह बंधनात अडकला

ऑनलाइन टीम
Sunday, 9 August 2020

इंडिया अ संघाचा नियमित सदस्य असलेला के एस भरत भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा अनकॅप्ड यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरतने 10 वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर अखेर आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह थाटला आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत के एस भरत अन् अंजलीचा विवाह सोहळा पार पडला. 26 वर्षीय भरतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विवाह समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.  

चहल म्हणाला आमचं ठरलं! वाचा कोणी घेतली फिरकीपटूची विकेट

इंडिया अ संघाचा नियमित सदस्य असलेला के एस भरत भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन वेळा त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये पिंक बॉल कसोटी सामन्यात ऋदिमानसाठी राखीव खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान मिळाले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात देखील ऋषभ पंत ऐवजी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. पण टीम इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We found love So much to look forward #myvalentine#precious#decadestrongandcounting

A post shared by srikar bharat (@konasbharat) on

2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण यावेळी ऋषभ पंतचा नंबर लागला. दुसरीकडे कसोटीमध्ये वृद्धीमान साहाने पुनरागमन केल्यामुळे भारतीय संघाकडून खेळण्याची केएस भरतची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. केएस भरत आयपीएमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे तो भारतीय संघाच्या शिबिरासच उपलब्ध होईल.  भरतच्या नावे प्रथम श्रेणीतील 78 सामन्यात 4183 धावा आहेत.  आंध्र प्रदेशच्या या गड्याने 51 अ लिस्ट सामन्यात 1351 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या काही हंगामात त्याने दिल्ली डेअर डेव्हिल्सचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या