भारत-पाक सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचे ट्विट

वृत्तसंस्था
Wednesday, 19 September 2018

सानियाने केलेल्या ट्विटमधून लोक मुर्खासाखे कॉमेंट टाकतात, त्यामुळे सामान्य माणसालाही विकार जडतो, अशावेळी गरोदर महिलेची काय गत होणार, असा टोला ट्रोलर्सना लगावला आहे. माझ्यामते हा फक्त एक क्रिकेटचा सामना आहे.

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना काही तासांवर आला असताना भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट करत सर्व सोशल मिडीया अकाऊंट साईन आऊट केली आहेत. 

भारतीय असलेल्या सानियाचा पती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होत असल्याने सोशल मिडीयावर यांना लक्ष्य करण्यात येते. यापूर्वीही सानियाला याचा अनुभव आला आहे. यामुळे तिने सामना सुरु होण्यास 24 तास असतानाच ट्विट करत सर्व सोशल मिडीयाच्या अकाउंटवरून साईन आऊट होत असल्याचे म्हटले आहे.

सानियाने केलेल्या ट्विटमधून लोक मुर्खासाखे कॉमेंट टाकतात, त्यामुळे सामान्य माणसालाही विकार जडतो, अशावेळी गरोदर महिलेची काय गत होणार, असा टोला ट्रोलर्सना लगावला आहे. माझ्यामते हा फक्त एक क्रिकेटचा सामना आहे.

संबंधित बातम्या