भारताला घ्यायचाय 'त्या' पराभवाचा बदला

सुनंदन लेले
Tuesday, 18 September 2018

दुबई : आशिया कप स्पर्धेतील साखळी सामन्यांना प्रेक्षकांच्या दृष्टीने तसे खूप महत्त्व नसते, अपवाद आहे अर्थात भारत वि पाकिस्तान सामन्याचा. आशिया खंडातील हे दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा प्रेक्षकांचे पाय आपोआप मैदानाकडे वळू लागतात. बुधवारी होणार्‍या सामन्याची 99%  तिकिटे कधीच विकली गेली आहेत. 1% जी तिकिटे विकायची बाकी आहेत त्या प्रत्येक तिकिटाची किंमत 1लाख 2 हजार रुपये आहे. सामना चालू होण्या अगोदर ती तिकिटेही विकली जातील असा संयोजकांना विश्वास आहे.

4 जून आणि 18 जून 2017 रोजी भारत वि पाकिस्तान एक दिवसीय सामने चँम्पीयन्स करंडक स्पर्धेत  रंगले होते. 4 जूनच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा दणका दिला होता. 18 जूनला नेमक्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा झटका दिला. खूप दिवसांनी मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केल्याने विजयोत्सव जोरदार साजरा केला गेला. भारतीय खेळाडूंच्या मनात तोच पराभव सलतो आहे. 

विराट कोहली संघात नसला तरी भारतीय संघ तुल्यबळ आहे असे वाटते. भारताची ताकद फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीत आहे. त्याउलट पाकिस्तानची ताकद वेगवान गोलंदाजीत जास्त आहे. मोहंमद आमीर आणि हसन अलीने भारतीय संघाला चँम्पीयन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पराभूत करताना जबरदस्त गोलंदाजी केली होती हे विसरून चालणार नाही. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार अजून दुखापतीतून 100% सावरलेला नाही. फकर झमान , बाबर आझम आणि इमाम उल हक सारख्या चांगल्या फलंदाजांना रोखण्याचे काम भारतीय गोलंदाजांना करावे लागणार आहे. गरम हवेने दुबई स्टेडियमच्या खेळपट्टीवर गवत नसणार आणि सामना पुढे सरकेल तशी खेळपट्टी संथ होत जाणार असा अंदाज आहे. दोनही संघातील फिरकी गोलंदाजांना संथ खेळपट्टीचा फायदा घेता येणार आहे. 

नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम फलंदाजी करून नंतर गार होत जाणार्‍या हवेचा आणि संथ होत जाणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेईल. सामना नसताना बर्‍याच वेळा सुनसान असलेल्या दुबई स्पोर्टस् सिटी स्टेडियमला बुधवारी चांगलीच जाग येणार आहे कारण भारत वि पाकिस्तान सामना पहिल्यांदाच या मैदानावर रंगणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या