सगळा स्टाफ तोच राहिल पण, फलंदाजीचं काय करायचं?

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या सपोर्ट स्टाफची घोषणा उद्या अपेक्षित असून, दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होडस, श्रीलंकेच्या थिलन समरवीरापासून भारताच्या प्रविण अमरे अशा इच्छुकांनी नावे अंतिम निवडीसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत.

जाँटी ऱ्होडस, मार्क रामप्रकाशपासून प्रविण अमरेपर्यंत सारेच शर्यतीत 
मुंबई - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या सपोर्ट स्टाफची घोषणा उद्या अपेक्षित असून, दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होडस, श्रीलंकेच्या थिलन समरवीरापासून भारताच्या प्रविण अमरे अशा इच्छुकांनी नावे अंतिम निवडीसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. 

भारतीय संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची निवड बाकी आहे. यांच्या निवडीचे अधिकार निवड समितीकडे असून, अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद उद्या ही निवड जाहीर करतील. 

प्रसाद यांनी यासाठी आलेल्या अर्जांमधून काही नावे निश्‍चित केली आहेत. त्यांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. हे सर्व काम उद्या गुरुवारपर्यंत पूर्ण होईल, असे "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

फलंदाजीसाठी कोण ? 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर संजय बांगर यांच्यावर कुऱ्हाड कोसळणार अशीच चर्चा अजून आहे. या पदासाठी इंग्लंडच्या मार्क रामप्रकाश, जोनाथन ट्रॉट, श्रीलंकेच्या थिलन समरवीरा, भारताच्या प्रविण अमरे, अमोल मुझुमदार, हृषिकेश कानिटकर आणि विक्रम राठोड यांची नावे पुढे आली आहेत. अर्थात, यापैकी कुणा एकाचे स्थान भक्कम नाही. 

भारत अरुण राहणार 
गोलंदाजी प्रशिक्षकासाठी वेंकटेश प्रसाद, सुनील जोशी, अमित भंडारी, पारस म्हांब्रे यांच्या मुलाखती होत असल्या तरी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहिल्याने गोलंदाजीसाठी भारत अरुण यांनाच पुनन्हा पसंती मिळण्याची शक्‍यता अधिक आहे. 

क्षेत्ररक्षणासाठी श्रीधरच 
दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडस याने अर्ज केला असला, तरी ही जबाबदारी पुन्हा एखदा श्रीधर यांच्याकडेच राहणार असा अंदाज आहे.


​ ​

संबंधित बातम्या