फ्रेंच ओपनसाठी कोण आहेत भारताचे शिलेदार?

टीम ई सकाळ
Monday, 22 October 2018

1. किदांबी श्रीकांत : फ्रेंच ओपन स्पर्धाची पर सिरीज स्पर्धेंमध्ये गणना केली जाऊ लागल्यापासून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा तो पहिला भारतीय आहे. त्याने 2017 मध्ये चार सुपर सिरीजमध्ये विजेतेपद पटकविले होते. यामध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचाही समावेश होता. यंदाच्या वर्षीत त्याने जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानही गाठले. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारा तो भारताचा केवळ दुसरा बॅडमिंटनपटू आहे. त्याला यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

1. किदांबी श्रीकांत : फ्रेंच ओपन स्पर्धाची पर सिरीज स्पर्धेंमध्ये गणना केली जाऊ लागल्यापासून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा तो पहिला भारतीय आहे. त्याने 2017 मध्ये चार सुपर सिरीजमध्ये विजेतेपद पटकविले होते. यामध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचाही समावेश होता. यंदाच्या वर्षीत त्याने जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानही गाठले. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारा तो भारताचा केवळ दुसरा बॅडमिंटनपटू आहे. त्याला यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

2. बी साई प्रणित : साईप्रणितने 2003मध्ये सर्वप्रथम मलेशियाच्या महंमद हशमीला थायलंड ओपन ग्रॅंड प्रिक्स गोल्ड स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2013 मध्ये त्याने माजी ऑलम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन तौफिक हिदायतला पहिल्याच फेरीत त्याच्याच घरच्या मैदानात त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभूत केले आणि त्यानंतर त्याने आजवर मागे वळून पाहिलेलेच नाही. 2010 मध्ये त्याने BWF ज्यनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉंझपदक पटकाविले. साईना नेहवाल, पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतनंतर सुपर सिरिज स्पर्धा जिंकणारा तो केवळ चौथा खेळाडू आहे. 2015 मध्ये त्याने बांगलादेश आंतरराष्ट्रीय, लागोस आंतरराष्ट्रीय आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 

3. समीर वर्मा : श्रीकांत आणि साईप्रणित यांच्यानंतर समीर वर्मा हे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील तिसरे आघाडीचे नाव आहे. त्याने 2011 मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्याने लखनऊमध्ये झालेल्या आशियाई ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. त्यानंतर त्याचवर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेतही पुरुष एकेरीत रौप्य पदक पटकाविले होते. 2012 मध्ये त्याने 36 व्या राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर त्याच वर्षी त्याने इराण ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्याने 2013मध्ये त्याच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकाविले.  

4. पी. व्ही. सिंधू : ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवून देणारी ती एकमेव बॅडमिंटनपटू आहे. सिंधूने यंदाच्या वर्षात कॉमनवेल्थ स्पर्धेत आणि जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही तिने रौप्य पदक मिळविले होते. आशियाई स्पर्धेत रोप्य पदक पटकाविणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमंटनपटू ठरली. गेली दोन वर्षे सलग तिने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकाविले आहे. 2015मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009मध्ये कोलंबो येथे झालेल्या आशियाई सब-ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉंझपदक पटकावले होते. सिंधूने 2013 मध्ये मलेशिया ओपन जिंकून तिच्या कारकिर्दीतील पहिले ग्रॅंड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकले. तिला 2013 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत सध्या ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

5. साईना नेहवाल : भारताची फुलराणी अशी ओळख असलेल्या साईना नेहवालने भारतातील बॅडमिंटनला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. 2009मध्ये तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानावर झेप घेतली होती. तिने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले तर 2015 मध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. जागतिक क्रमावारीत अव्वल स्थान पटकाविणारी ती भारताची एकमेव महिला बॅडमिंटनपटू आहे. 

तिने ऑलम्पिकमध्ये तीन वेळा भारताचे प्रतिनिधत्व केले आहे. त्यात तिने एकदा ब्रॉंझपदक पटकाविले आहे.  BWF च्या प्रत्येक स्पर्धेत महिला एकेरीत पदक मिळविणारी ती एकमेव भारतीय आहे तर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटपटू आहे. तला 2009 आणि 2010 दरम्यान अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे तर 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या