'पाकिस्तान जिंदाबाद'ला 'गणपती बाप्पा मोरया'ने प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मुलगी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असतानाच भारतीय चाहत्यांकडून मोरया मोरया चा गजर ऐकायला मिळाला.

दुबई : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रत्येक सामन्यात चाहत्यांमध्ये वेगळीच ईर्षा संचारलेली असते. या सामन्यात प्रत्येक चाहता आपापल्या संघाला पाठिंबा देत विविध घोषणा देत असतो. याच सामन्यादरम्यान भारताच्या पाठिराख्यांनी 'गणपती बाप्पा मोरया' चा गजर केला. 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना पाकिस्तानाचे पाठिराखे 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देत होते. त्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय पाठिराख्यांनी 'गणपती बाप्पा मोरया'चा एकच गजर केला. 

प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मुलगी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असतानाच भारतीय चाहत्यांकडून मोरया मोरया चा गजर ऐकायला मिळाला. संपूर्ण भारतभर सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.

संबंधित बातम्या