Breaking : विश्वकरंडकासाठी टीम इंडियाचा तगडा संघ जाहीर

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. त्यासाठी भारतीने आज संघ जाहीर केला आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. 

मुंबई : पुढील वर्षी पुरुष आणि महिला ट्वेंटी20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत. या स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. त्यासाठी भारतीने आज संघ जाहीर केला आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. 

IPL 2020 : आता आयपीएलमध्येही 'हॉल ऑफ फेम'; दादाची भन्नाट कल्पना

भारतीय संघाने यापूर्वी चार वेळा 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला आहे. त्यामुळे यंदाही भारताला विजेतेपदाचा प्रबळ दवेदार मानला जात आहे. 

आयपीएल लिलाव होण्यापूर्वी द्रविडने दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाला...

भारतीय संघ : प्रियांक गर्ग (कर्णधार),  ध्रुवचंद जुरेल ( उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग  हेगडे, रवी विश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा ( यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.
 


​ ​

संबंधित बातम्या