'आयओए'कडून 572 खेळाडूंची नावे जाहीर 

वृत्तसंस्था
Friday, 10 August 2018

नवी दिल्ली / मुंबई : भारतीय ऑलिंपिक संघटना आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्यातील भारतीय पथकाच्या संख्येचा वाद अजूनही संपण्यास तयार नाही. भारतीय पथकाच्या शुभेच्छा कार्यक्रमानंतरही याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने आपल्या संकेतस्थळावर सहभागी 572 खेळाडूंची यादी जाहीर करून क्रीडा खात्याला शह देण्याचा प्रयत्न केला. 

नवी दिल्ली / मुंबई : भारतीय ऑलिंपिक संघटना आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्यातील भारतीय पथकाच्या संख्येचा वाद अजूनही संपण्यास तयार नाही. भारतीय पथकाच्या शुभेच्छा कार्यक्रमानंतरही याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने आपल्या संकेतस्थळावर सहभागी 572 खेळाडूंची यादी जाहीर करून क्रीडा खात्याला शह देण्याचा प्रयत्न केला. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने खेळाडू जाहीर केले असले तरी संघासोबत मार्गदर्शक, सहायक मार्गदर्शक, व्यवस्थापक, फिझिओ यांसारखा सपोर्ट स्टाफ किती असणार, हे मात्र जाहीर करणे टाळले आहे. संकेतस्थळावरील अनाऊन्समेंट विभागात याबाबतची लिंक देण्यात आली आहे, पण त्यात यास केंद्रीय क्रीडा खात्याच्या मंजुरीचा कोणताही उल्लेख नाही. केंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय पथक नेमके किती सदस्यांचे हेही सांगितलेले नाही. मान्यताप्राप्त नसलेल्या खेळांच्या खेळाडूंच्या किटचा खर्च करण्याची तयारी दाखवत क्रीडा मंत्रालयाने आपण सर्वांना प्रोत्साहत दाखवत असल्याचे दाखवले, पण भारतीय ऑलिंपिक संघटना नियमित खेळांना पुरेसे साह्य करीत नसल्यामुळे नाराज आहे. 

खेलो इंडिया योजनेअंतर्गत निवडलेल्या नवोदित खेळाडूंच्या निवडीवरून यापूर्वीच भारतीय ऑलिंपिक संघटनेने नाराजी दाखवली आहे. आता क्रीडा खाते स्पोर्टस्‌ इंडियाच्या मदतीने मार्गदर्शकांच्या निवडीवर आक्षेप घेत असल्यामुळे भारतीय ऑलिंपिक संघटना नाराज आहे. त्यांनी केंद्रीय क्रीडा खाते नाकारणाऱ्या मार्गदर्शक, तसेच सपोर्ट स्टाफला स्वखर्चानेही पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने एकंदर नऊशे सदस्यांच्या पथकास मंजुरी मागितली आहे, पण क्रीडा खाते त्यात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याची शक्‍यता आहे. भारतीय पथकातील सदस्य संख्या आठशेच्या आसपासच असेल, असे सांगितले जात आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय क्रीडा मंत्र्याचाच असेल, असेही सूत्रांनी सांगितले. 

खेळानुसार खेळाडू 
तिरंदाजी 16 
ऍथलेटिक्‍स 50 
बॅडमिंटन 20 
बास्केटबॉल 12 
बॉक्‍सिंग 10 
बोलिंग 6 
ब्रिज 24 
कॅनोई कयाक 49 
सायकलिंग 15 
अश्‍वारोहण 7 
तलवारबाजी 4 
जिम्नॅस्टिक 10 
गोल्फ 7 
हॅंडबॉल 32 
हॉकी 36 
ज्युदो 6 
कबड्डी 24 
कराटे 2 
कुराश 14 
पेनकाक सिलात 3 
रोलर स्पोर्टस्‌ 4 
रोईंग 34 
सेलिंग 9 
सेपाक तेकराव 24 
नेमबाजी 28 
स्क्वाश 8 
जलतरण 10 
डायव्हिंग 2 
स्पोर्ट क्‍लायम्बिंग 3 
टेनिस 12 
तायक्वांदो 8 
सॉफ्ट टेनिस 10 
टेबल टेनिस 10 
व्हॉलीबॉल 28 
वेटलिफ्टिंग 4 
कुस्ती 18 
वुशू 13

संबंधित बातम्या