आशियाई स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले 

वृत्तसंस्था
Tuesday, 31 July 2018

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक या ना त्या कारणाने वाढतच आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बोट रेसिंग संघाच्या समावेशाचे आदेश दिले आहेत. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने या संघाला प्रवेश नाकारला होता. त्यानंतर संघातील एक खेळाडू अभय सिंग याने दिल्ली उच्च न्यायालयात ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ऑलिंपिक संघटनेने बोट संघाने निवडीचे निकष पार न केल्याचे कारण दिले होते. 

यालाच अभयने आव्हान दिले होते. या संदर्भातील याचिकेवर सोमवारी सुनावणी घेतली होती. त्या वेळी त्यांनी अभयच्या बाजूने निर्णय देत भारतीय ऑलिंपिक संघटनेला या संघाच्या समावेशाचे आदेश दिले. 

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ऑलिंपिक संघटनेने तातडीने बोट संघाची प्रवेशिका पाठविल्याचे संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले. ते म्हणाले,""आम्ही आमच्याबाजूने सर्व सहकार्य केले आहे. बोट संघाची प्रवेशिका पाठविण्यात आली आहे, आता ती स्विकारायची की नाही हे संयोजकांवर अवलंबून असेल.'' 

भारतीय कयाकिग आणि कॅनोईंग संघटनेचे सचिव प्रशांत कुशवा म्हणाले,""स्पर्धेत पुरुष आणि महिलांचा संग सहभागी होईल. दोन्ही संघांत प्रत्येकी सोळा खेळाडू असतील. मात्र, क्रीडा मंत्रालय किती खेळाडूंना परवानगी देते यावर सारे अवलंबून आहे. या स्पर्धेसाठी 12 जणांचा संघ रेसमध्ये सहभागी होतो.''

संबंधित बातम्या