विराट विजयी टीम पुन्हा बदलणार की ?

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

 विराट कोहलीने कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक कसोटी क्रिकेट सामन्यात त्याने संघात काही ना काही बदल केले आहेत. कर्णधार म्हणून आतापर्यंतच्या 38 पैकी एकाही कसोटीत त्याने आधीच्या सामन्यातील संघ कायम ठेवलेला नाही. साऊदम्प्टनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मात्र विराट प्रथमच कोणताही बदल न करता संघ मैदानात उतरविण्याची दाट शक्‍यता आहे. 

लंडन : विराट कोहलीने कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक कसोटी क्रिकेट सामन्यात त्याने संघात काही ना काही बदल केले आहेत. कर्णधार म्हणून आतापर्यंतच्या 38 पैकी एकाही कसोटीत त्याने आधीच्या सामन्यातील संघ कायम ठेवलेला नाही. साऊदम्प्टनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मात्र विराट प्रथमच कोणताही बदल न करता संघ मैदानात उतरविण्याची दाट शक्‍यता आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 असा पिछाडीवर आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने ट्रेंट ब्रिजमध्ये सांघिक कामगिरी उंचावत इंग्लंडवर मात केली. त्यामुळे हाच उत्साह आणि हेच खेळाडू कायम ठेवत विराट चौथ्या सामन्याची व्यूहरचना आखत असल्याचे सरावातून दिसून आले. चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने कालपासून सराव सुरू केला. यात गेल्या कसोटीत खेळलेल्यांनीच प्रामुख्याने सराव केला. किंबहुना, सरावादरम्यान फलंदाजीची क्रमवारीही तीच कायम राखण्यात आली होती. 

नॉटिंगहॅममधील सामन्यात दुखापत झालेला अष्टपैलू रविचंद्रन आश्‍विनने फलंदाजीचा सराव केला; पण काल त्याने गोलंदाजी केली नाही. दुखापतीतून आश्‍विन पूर्ण तंदुरुस्त न झाल्यास मात्र भारतीय संघात बदल करावा लागेल. अन्यथा हा संघच चौथ्या कसोटीतही खेळेल, अशी दाट शक्‍यता आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या दोन तरुण खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि हनुमा विहारी या तीन तरुण खेळाडूंना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अधिक वेळ दिला. 

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील भारतीय संघ 
शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन आश्‍विन, ईशांत शर्मा, महंमद शमी, जसप्रित बुमरा 

राखीव खेळाडू 
रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, करुण नायर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, हनुमा विहारी, उमेश यादव


​ ​

संबंधित बातम्या