'हा' नाही तर 'तो' वृत्तीमुळे भारतीय खेळाडूंमध्ये नाराजी

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

प्रत्येक सामन्यागणिक भारतीय कसोटी संघात होणाऱ्या बदलांमुळे संघातील खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आजवर 39 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने फक्त एकाच सामन्यात संघात बदल केला नाही. 

लंडन : प्रत्येक सामन्यागणिक भारतीय कसोटी संघात होणाऱ्या बदलांमुळे संघातील खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आजवर 39 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने फक्त एकाच सामन्यात संघात बदल केला नाही. 

''पहिल्या तिन्ही सामन्यात संघात बदल होणार नाही, तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करा, हे संघ व्यवस्थापनाने मालिकेपूर्वीच सांगितले असते तर सर्वच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असता. कोहली चांगला कर्णधार असून त्याला संघासाठी नेहमी सर्वोत्तम द्यायचे असते मात्र, संघातील बदलांमुळे खेळाडू स्वत:च्या क्षमतेवर शंका घेतात. खेळाडू म्हणून आम्ही असा विचार करणे चुकीचे आहे पण आम्ही सुद्धा माणूस आहोत,'' अशी भावना भारतीय संघातील एका खेळाडूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नाव न सांगता व्यक्त केली. 

भारतीय संघातील स्थान कायम अस्थिर असल्याने कामगिरीवर होणाऱ्या परिणामांकडे आणखी एका खेळाडूने लक्ष वेधले. तो म्हणाला, ''सततच्या बदलांमुळे कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाच्या धोरणाबद्दल खेळाडूंच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण होते. आणि तुम्ही एकटे पडल्याचा भास होऊ लागतो.''  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी मालिकेला आज ओव्हलवर सुरवात होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या