भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं काम देखील चालणार घरातून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

ऑलिम्पक ही स्पर्धा चार वर्षांनी खेळवली जाते. ही स्पर्धा यंदा म्हणजेच 24 जूलै 2020 पासून जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे.

दिल्ली : कोरोना व्हायरसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. यामध्ये स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक क्रीडा संघटना देखील मागे नाहीत. कोरोना व्हायरसच्या भितीमुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपल्या कार्यालयास टाळं ठोकले आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने इंग्लडच्या संघाला दिली ‘ही’ ऑफर

ऑलिम्पक ही स्पर्धा चार वर्षांनी खेळवली जाते. ही स्पर्धा यंदा म्हणजेच 24 जूलै 2020 पासून जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे. ही स्पर्धा नऊ ऑगस्ट पर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकची तयारी आता पासूनच करावी लागत आहे. मात्र कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने चक्क आपल्या कार्यालयालाच टाळं लावण्याचा निर्णय घेतला आणि कृती देखील आहे. 

कोरोना मुळे सौरव गांगुली देखील आहे सुट्टीवर...  

कोरोना बाधित लोकांची संख्या भारतामध्येही वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपले कार्यालय बंद केले आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम असे निर्देश दिले आहेत. जगभरातील जवळपास सर्व देशात कोरोना रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 141 हून अधिक देशात करोना व्हायरस पसरला आहे. भारतात 107 लोकांना याची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना जगभरात सात हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रावर कोरोना परिणाम झालेला आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित देखील झालेल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या