'ना निडल' पॉलिसीचे काटेकोर पालन करा 

वृत्तसंस्था
Wednesday, 1 August 2018

काय केल्या सूचना 
-औषधे बरोबर ठेवल्यास ती पारदर्शक कव्हरमध्ये घ्यावीत 
-मान्यताप्राप्त डॉक्‍टरांचे प्रिसक्रीप्शन, वैद्यकीय स्थिती, औषधांची संख्या यांची नोंद ठेवावी 
-खेळाडू किंवा पदाधिकाऱ्यास इंजेक्‍शन प्रिसक्राईब केले असल्यास क्रीडा ग्राममधील वास्तव्यात औषधे आणि नीडल्स क्रीडा ग्राममधील "आयओए'च्या कार्यालयात जमा करावीत 
-काही हेतुंसाठी खेळाडू औषधे घेत असल्यास त्याची माहिती आशियाई ऑलिंपिक समिती आणि उत्तेजक विरोधी समितीला आधीच द्यावी

नवी दिल्ली : उत्तेजक प्रतिबंधाविषयी खेळाडूंना जागरुक करताना भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) आशियाई स्पर्धेसाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना "नो निडल' पॉलिसीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

राष्ट्रीय क्रीडा संघटनांना पाठविलेल्या पत्रातून "आयओए'ने ही सूचना केली आहे. खेळाडूंनी आजारी असल्यास त्यांनी डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधांचाच वापर करावा. कुठल्याही प्रकारे अन्य औषधे किंवा सिरींजचा उपयोग टाळावा अशा सूचना या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. 

देशाची प्रतिमा मलिन होणार नाही याची जबाबदारी खेळाडूंनीच घ्यायची आहे असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. राष्ट्रकुल स्पर्धे दरम्यान काही भारतीय खेळाडूंच्या खोलीबाहेर सिरींज आढळल्या होत्या. त्यावरून दोघा खेळाडूंवर कारवाई देखील करण्यात आली होती. 

स्पर्धे दरम्यान आशियाई ऑलिंपिक समिती आणि उत्तेजक विरोधी मार्गदर्शक तत्त्वे आणि "नो निडल' पॉलिसीचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही "आयओए'ने पत्रात नमूद केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित खेळाडू आणि पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. त्या वेळी आपल्या देशाची मान खाली झुकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही नियमाचे उल्लंघन खेळाडूंनी करू नये असे देखील "आयओए'ने सूचित केले आहे. 

काय केल्या सूचना 
-औषधे बरोबर ठेवल्यास ती पारदर्शक कव्हरमध्ये घ्यावीत 
-मान्यताप्राप्त डॉक्‍टरांचे प्रिसक्रीप्शन, वैद्यकीय स्थिती, औषधांची संख्या यांची नोंद ठेवावी 
-खेळाडू किंवा पदाधिकाऱ्यास इंजेक्‍शन प्रिसक्राईब केले असल्यास क्रीडा ग्राममधील वास्तव्यात औषधे आणि नीडल्स क्रीडा ग्राममधील "आयओए'च्या कार्यालयात जमा करावीत 
-काही हेतुंसाठी खेळाडू औषधे घेत असल्यास त्याची माहिती आशियाई ऑलिंपिक समिती आणि उत्तेजक विरोधी समितीला आधीच द्यावी

संबंधित बातम्या