Asian Games 2018 : भारतीय महिला कबड्डी संघाचा अंतिम फेरीत पराभव

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाला अंतिम फेरीत पराभवा स्वीकारावा लागल्याने त्यांनी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. इराणने भारतीय संघाला 27-24 असे पराभूत करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. 

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाला अंतिम फेरीत पराभवा स्वीकारावा लागल्याने त्यांनी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. इराणने भारतीय संघाला 27-24 असे पराभूत करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. 

पूर्वाधात जोरदार खेळ करत भारतीय संघाने 13-11 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात मात्र इराणने जोरदार पुनरागमन करत भारताचा तीन गुणांनी पराभव केला. भारतीय पुरुष संघालाही काल (गुरवार) इराणनेच पराभूत केले होते. हे भारताचे आशियाई स्पर्धेतील पाचवे रौप्य पदक आहे. 


​ ​

संबंधित बातम्या