भारतीय हॉकी संघांची सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

कोरोना विष्णुाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील विलगीकरण कक्षात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंची व्यवस्था केली आहे.

बंगळूर : कोरोना विष्णुाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रातील विलगीकरण कक्षात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंची व्यवस्था केली आहे. परंतु टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने सुरक्षित वातावरणात सरावास प्रारंभ केला आहे.

आयपीएलमध्ये धोनीपेक्षा 'हा' कर्णधार आहे यशस्वी
 
हा सराव उत्तम पद्धतीने सुरु आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी साई केंद्र बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येत नाही. केवळ नियमित सराव सत्रात इमारतीव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. कोरोनाचा आमच्या सरावावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही नियमितपणे सराव करीत आहे. स्वच्छतेची काळजी घेत आहोत. सातत्याने हात धुण्याची क्रिया सुरु असते. आमच्या शरीराचे तापमानही वारंवार तपासले जात आहे. आम्हांला सुरक्षित वातावरणात सराव करता यावा, याची पूर्ण दक्षता साई केंद्रातील अधिकारी घेत आहेत असे खेळाडूंनी नमूद केले. याबरोबरच प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही ऑलिम्पिकसाठी कसून सराव करत आहोत, असे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने सांगितले. 

घराच्या शोधात आहात, शेन वॉर्न विकतोय...किंमत आहे एवढी

महिला संघाची कर्णधार राणी रामपाल म्हणाली हिने ही सराव योग्यरित्या सुरु असल्याचे सांगितले. राणी म्हणाली आमच्या सरावात खंड पडू नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. हॉकी संघांना ऑलिम्पिकसाठी सराव करता यावा, यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत आहे. आम्ही सर्वच खेळाडू आवश्‍यक खबरदारी घेत आहोत. आम्हांला आमचे उद्दिष्ट साध्य करता यावे, यासाठीच साई पदाधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू असल्याचे तिने नमूद केले.


​ ​

संबंधित बातम्या