फिफा रँकिंग स्पर्धेत भारत अठरा वर्षांनंतर सहभागी 

वृत्तसंस्था
Tuesday, 9 April 2019

दृष्टिक्षेपात 
- स्पर्धेत चार संघ सहभागी 
- यजमान थायलंडसह व्हिएतनाम व क्‍युरासो 
- एप्रिलच्या फिफा क्रमवारीनुसार क्‍युरासो (82), व्हिएतनाम (98), भारत (101), तर थायलंड (114) 
- क्‍युरासो हे कॅरेबियन व डच कॅरेबियन सागरातील बेट 
- हा देश नेदरलॅंड्‌सच्या आधिपत्याखाली आहे 
- सर्व सामने बुरीराममधील चॅंग एरीनावर होणार 
- स्टेडियमची आसनक्षमता 36 हजार 
- "फुटबॉल असोसिएशन ऑफ थायलंड'तर्फे 1968 पासून स्पर्धेचे आयोजन 
- भारत यापूर्वी 1977 मध्ये सहभागी 

नवी दिल्ली : "ब्ल्यू टायगर्स' असे टोपणनाव मिळालेला भारतीय फुटबॉल संघ 18 वर्षांच्या खंडानंतर फिफा रॅंकिंग स्पर्धेत भाग घेईल. जून महिन्यात थायलंडमध्ये होणाऱ्या किंग्ज कप स्पर्धेचे भारताला आमंत्रण मिळाले आहे. 

पाच जून रोजी दोन सामने होतील. त्यातील विजयी संघ अंतिम फेरीला पात्र ठरतील, तर हरलेले संघ तिसऱ्या क्रमांकासाठी खेळतील. भारताने यापूर्वी 2001 मध्ये क्वालालंपूरमधील मर्डेका कप स्पर्धेत भाग घेतला होता. 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले, की नव्या राष्ट्रीय प्रशिक्षकांना संघाचा गाभा समजण्यासाठी ही स्पर्धा योग्य व्यासपीठ ठरेल. मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याची नियुक्ती झाली असेल. 2022च्या फिफा विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेचे सामने सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. किंग्ज कप स्पर्धेमुळे भारताला पुढील खडतर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य पद्धतीने तयारी करता येईल. या स्पर्धेचे आमंत्रण दिल्याबद्दल मी थायलंड संघटनेचा ऋणी आहे. 

गेल्या वर्षी ही स्पर्धा स्लोव्हाकियाने जिंकली होती. अंतिम सामन्यात त्यांनी थायलंडला 3-2 असे हरविले होते. गबॉनने संयुक्त अरब अमिरातीला 1-0 असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला होता. 

दृष्टिक्षेपात 
- स्पर्धेत चार संघ सहभागी 
- यजमान थायलंडसह व्हिएतनाम व क्‍युरासो 
- एप्रिलच्या फिफा क्रमवारीनुसार क्‍युरासो (82), व्हिएतनाम (98), भारत (101), तर थायलंड (114) 
- क्‍युरासो हे कॅरेबियन व डच कॅरेबियन सागरातील बेट 
- हा देश नेदरलॅंड्‌सच्या आधिपत्याखाली आहे 
- सर्व सामने बुरीराममधील चॅंग एरीनावर होणार 
- स्टेडियमची आसनक्षमता 36 हजार 
- "फुटबॉल असोसिएशन ऑफ थायलंड'तर्फे 1968 पासून स्पर्धेचे आयोजन 
- भारत यापूर्वी 1977 मध्ये सहभागी 


​ ​

संबंधित बातम्या