भारताचा तिरंगा चीन, पाकिस्तानच्या वर फडकतो तेव्हा...

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

तिरंगा अभिमानाने फडकत असताना कोणाला आवडत नाही आणि तो पण आपले शेजारील देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या वर. असेच काही चित्र सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाले. 

जकार्ता : तिरंगा अभिमानाने फडकत असताना कोणाला आवडत नाही आणि तो पण आपले शेजारील देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या वर. असेच काही चित्र सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाले. 

आशियाई स्पर्धेत सोमवारी भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली. नीरजने 88.06 मीटर भालाफेकत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जवळही येवू दिले नाही. नीरजने ही कामगिरी करत आपलाच विक्रम मोडीत काढला. त्यावेळी त्याच्याशी शर्यतीत असलेल्या चीनच्या लियू क्विझेन याने 82.22 मीटर भालाफेक करत रौप्यपदक पटकाविले. तर, पाकिस्तानच्या अरशद नदीमने 80.75 मीटर भालाफेकवर ब्राँझवर आपले नाव कोरले. 

पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सुवर्णपदक विजेत्या देशाचा झेंडा मधोमध सर्वांत वर लावला जातो. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या देशाचे झेंडा खाली असतात. भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि चीनचे झेंडा भारताच्या खाली पाहून उपस्थितांचे उर अभिमानाने भरून आले. नीरजच्या सुवर्णपदकासह भारतीयांना असे चित्र पाहण्याचाही दुहेरी आनंद लाभला.


​ ​

संबंधित बातम्या