World Cup 2019 : लॉर्ड्सवर भारताचा पाकिस्तानला सपोर्ट

वृत्तसंस्था
Monday, 24 June 2019

दोन पाकिस्तानी समर्थकांसह भारतीय संघाची निळी जर्सी घालून उभ्या या इंडियन फॅनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या इंडियन फॅनने त्याच्या हातात एक पोस्टरही पकडला होता ज्यावर, "तुमच्या शेजाऱ्यांकडुन तुम्हाला सपोर्ट, कम ऑन पाकिस्तान " असा संदेश लिहिला होता. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : रविवारी पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकादरम्यान रंगतदार सामना खेळला गेला. आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत लॉर्ड्सच्या मैदानात पाक संघाने दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही वाखाणण्याजोगी होती. खरे तर मँचेस्टरमध्ये भारता विरुद्ध पराभूत झाल्यानंतर, पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये संघाविरूद्ध खूप निराशा होती. पण तरीही पाकिस्तानी लोक त्यांच्या संघाचे समर्थन करण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानात  आले. पण यात सगळ्यात वैशिष्टपुर्ण गोष्ट ठरली ती पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी आलेला 'इंडियन फॅन' 

दोन पाकिस्तानी समर्थकांसह भारतीय संघाची निळी जर्सी घालून उभ्या या इंडियन फॅनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या इंडियन फॅनने त्याच्या हातात एक पोस्टरही पकडला होता ज्यावर, "तुमच्या शेजाऱ्यांकडुन तुम्हाला सपोर्ट, कम ऑन पाकिस्तान " असा संदेश लिहिला होता. 

हे फोटो 'क्रिकेट वर्ल्ड कप' च्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' या कॅप्शनसह 23 जून रोजी पोस्ट केले आहेत. या हटके प्रकारावर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

​ ​

संबंधित बातम्या