तंदरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटू चार टप्प्यात कारणार सराव!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

आर. श्रीधर हे 2014 साल पासून भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या सराव शिबीरास सुरुवात झाल्यानंतर संघातील प्रमुख क्रिकेटपटूंसाठी चार टप्प्यात सरावाची योजना बनवण्यात येणार असून शिबीर सुरु झाल्यानंतर चार आठवड्यांच्या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी पुर्ण फिटनेस मिळवण्यात येईल अशी माहिती भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी दिली आहे. 

श्रीधर हे 2014 साल पासून भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत, कोरोना व्हायरस माहामारीमुळे बंद बडलेल्या क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यानंतर भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पुर्णपणे तयार असेल असा विश्वास श्रीधर यांनी यावेळी व्यक्त केला. जेव्हा बीसीसीआयकडून सारावासाठी तारीख देण्यात आल्यानंतर पहिल्या स्तरापासून सराव सुरु करण्यात येईल. खेळाडू बऱ्याच काळापासून मैदानापासून दूर आहेत, त्यामुळे खेळाडूंवर पडणारा अतिरिक्त ताण तसेच उद्भवणाऱ्या दुखापती याबाबतही श्रीधर यांनी सविस्तरपणे माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सुरुवातीलाच खेळाडूंवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. सुरुवातीला त्यांच्याकडून आम्ही हलका सराव करून घेणार आहोत.’’

"भगव्या जर्सीतील टीम इंडियाचा तो पराभव हिरव्या जर्सीला अजूनही झोंबतोय"

श्रीधर यांनी सरावाचे योग्य नियोजन करण्यावर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगीतले, गरजेपेक्षा जास्त सराव केल्याने खेळाडू जखमी होण्याची शक्यता असते. “ सुरुवातीला कमी सराव केला पाहिजे, त्यानंतर हळूहळू सरावचा स्तर वाढवणे योग्य राहिल.” असे मत श्रीधर यांनी व्यक्त केले. “वेगवान गोलंदाजांसाठी अर्धा किंवा त्यापेक्षाही कमी रनअप घेत वेगावर नियंत्रण ठेवत गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा सराव करताना खेळाडू दहा मिटर अंतरावरून थ्रो करतील तर फलंदाज पाच ते सहा मिनीटांच्या सरावाने सुरुवात करतील.”  क्रिकेटपटूना कोसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कमीत कमी सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. प्रत्येक खेळाडूला सामना खेळण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो अशी माहिती श्रीधर यांनी यावेळी दिली. 

 


​ ​

संबंधित बातम्या