आरोग्य महत्वाचे, कुटूंब घरीच बरे 

शैलेश नागवेकर
Sunday, 2 August 2020

महामारीचा धोका नसता तर अजिंक्‍य रहाणेला पत्नी आणि मुलीला स्वतःबरोबर दौऱ्यावर न्यायला आवडले असते, परंतु कोरोना पार्श्‍वभूमीवर सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यामुळे कुटूंब घरीच असलेले बरे, अशी भूमिका त्याने व्यक्त केली आहे. 

मुंबई : महामारीचा धोका नसता तर अजिंक्‍य रहाणेला पत्नी आणि मुलीला स्वतःबरोबर दौऱ्यावर न्यायला आवडले असते, परंतु कोरोना पार्श्‍वभूमीवर सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यामुळे कुटूंब घरीच असलेले बरे, अशी भूमिका त्याने व्यक्त केली आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

यंदाच्या आयपीएलमध्ये रहाणे राजस्थान रॉयल्सऐवजी दिल्ली कॅपीटल संघातून खेळताना दिसणार आहे. कोरोनाची महामारी नसती तर पत्नी आणि मुलीला दौऱ्यावर नेण्यासाठी मीही प्राधान्य दिले असते पण सध्याची परिस्थिती पहाता पत्नी, मुलीच्या आरोग्याची सुरक्षा महत्वाची आहे. इतकेच नव्हे तर आपल्याबरोबर आपल्या संघसहकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी करायला हवी, असे रहाणेने म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

आरोग्य पहिले नंतर क्रिकेट असा विचार मी केलेला आहे. गेले चार-पाच महिने लॉकडाउनमुळे आम्ही एकत्रच रहात आहोत. घराबाहेर गेलेलो नाही, असे सांगून रहाणे म्हणतो, कोरोना अजून गेलेला नाही. बाहेर पडल्यानंतर तो अजूबाजुला असू शकतो त्यामुळे पत्नी-मुलं अशा कुटूंबाची सुरक्षा मला अधिक वाटते. 

दिल्ली कॅपीटल या संघातून खेळण्याबाबत रहाणे म्हणतो, दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंगच्या अनुभवाचा वापर करण्यास मी उत्सुक आहे. गेल्या मोसमात मी इंग्लिश कौंटी स्पर्धेत हॅम्पशायर संघातून खेळत असताना दिल्ली कॅपीटलची मला ऑफर आली. त्यावर मी बराच विचार केला आणि दिल्ली संघातून खेळण्याचा निर्णय घेतला.

 


​ ​

संबंधित बातम्या