हार्दिक पंड्याने काल दिली प्रेमाची कबुली; आज केलं तिला प्रपोज!

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 January 2020

यापूर्वी हार्दिकचे नाव बॉलिवूडमधील इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम या अभिनेत्रींशी जोडले गेले होते.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने 2020 या नवीन वर्षाची सुरवात एकदम धूमधडाक्यात केली आहे. काल 2019 या वर्षाला रामराम करताना हार्दिकने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती, तर आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीही त्याने आणखी एक गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉलिवूड अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅमकोविचसोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे काल जाहीर केल्यानंतर आज त्याने नताशाला प्रपोजही केले आहे. ही गोड बातमी त्याने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan.  01.01.2020  #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

- Video : क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द बघून सचिन झाला भावूक!

नताशासोबतचा फोटो शेअर करताना हार्दिकने त्याला 'मैं तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान' असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. एका खासगी यॉटवर आपल्या निवडक मित्र आणि एका छोटेखानी बँडच्या उपस्थितीत समुद्राच्या साक्षीनं त्याने नताशाला प्रपोज केले. 
 
काल हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड नताशासोबतचा फोटो शेअर करताना आपण नवीन वर्षाची सुरवात आपल्या फायरवर्कसोबत करत असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले होते. यावर त्याचे टीममेट युजवेंद्र चहल, सिद्धेश लाड, कुलदीप यादव यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Starting the year with my firework 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

-INDvsSL : भारतात खेळायचं म्हणून 18 महिन्यानंतर त्याला घेतलं संघात

यापूर्वी त्याने नताशासोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. मात्र, नवीन वर्षाचे औचित्य साधत त्याने आपल्या प्रेमाची जगजाहीर कबुली दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Baby jaan  Curly 

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

दरम्यान, ऑगस्ट 2019 पासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत होत्या. अनेक पार्ट्यांमध्येही ते एकत्र दिसले. मात्र, त्यांनी कधीच आपले नाते जाहीर केले नाही. नताशा 'नच बलिये' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी हार्दिकने तिच्यासाठी मतंही मागितली होती. तसेच हार्दिकच्या वाढदिवशी नताशाने एक रोमँटिक पोस्टही लिहली होती. 

-अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

यापूर्वी हार्दिकचे नाव बॉलिवूडमधील इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम या अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मात्र आता हार्दिकने नताशाला प्रपोज केल्याने सगळ्या गोष्टींवर पडदा पडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on


​ ​

संबंधित बातम्या