भारतीय संघातील भरवशाच्या फलंदाजाने तीन महिन्यानंतर बांधले पॅड, म्हणाला...

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

सरावाला सुुरुवात करताना खूप काळानंतर बॅट हातात घेतल्याची भावना मनात होती. पण फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर वाटले की कालचा सराव संपल्यानंतर पुन्हा सराव सुरु केलाय.

राजकोट : भारतीय कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) आणि रणजी चषक स्पर्धेतील सौराष्ट्र संघाचा कर्णधार कर्णधार जयदेव उनादकटने (Jaydev Unadkat) तीन महिन्यानंतर सरावासाठी पॅड बांधून बॅट हातात घेतली. मार्चमध्ये रणजी चषकावर नाव कोरल्यानंतर पहिल्यांदा ते सरावासाठी नेटमध्ये उतरले.  पुजारासह जलदगती गोलंदाज उनादकट, फलंदाद अर्पित वसावडा आणि मध्यम गतीने गोलंदाजी करणाऱ्या प्रेरक मांकडने राजकोटस्थित अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली.  चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. यामध्ये तो प्रॅक्टिस करत असताना पाहायला मिळते. पुजाराने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की,  सरावाला सुुरुवात करताना खूप काळानंतर बॅट हातात घेतल्याची भावना मनात होती. पण फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर वाटले की कालचा सराव संपल्यानंतर पुन्हा सराव सुरु केलाय. 

जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमचीही स्पर्धा संकटात येईल : पेरी

देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार केल्यास राजकोटमध्ये कोरोनाचा प्रभाव इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत याठिकाणी 185 कोरोना केसेस समोर आल्या आहेत. रणजी चषकाच्या मागील हंगामात बंगालविरुद्ध दमदार कामगिरी करुन सामनावीरचा पुरस्कार पटकवणाऱ्या वसावडा यानेही सरावानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की आम्ही दहा दिवसांपासून सरवाला सुरुवात केली आहे. लॉकडाउनच्या काळात आम्ही तंदुरुस्तीवर लक्ष दिले. त्यावेळी आमच्याकडे नेट प्रॅक्टिससाठी कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता फायनली आम्ही सरावाला सुरुवात केली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज पाक संघातील तिघांना कोरोना; पुढे काय ऐकायला मिळणार?

सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करुनच आम्ही सराव करत आहोत, असेही त्याने आवर्जून सांगितले. मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरणे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. खंड पडल्यामुळे पुन्हा नवी सुरुवात करताना दुखापत होऊ नये, याची खबरदारी म्हणून सुरुवातीला कमी वेळ सराव करत आहे, असेही त्याने सांगितले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या थूंकीवर निर्बंध घातले आहेत. सरावादरम्यान या नियमाचे पालन करत आहोत, असेही तो म्हणाला.  
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Back at it...felt like a long time away but just as i took the stance felt as if it was yesterday

A post shared by Cheteshwar Pujara (@cheteshwar_pujara) on


​ ​

संबंधित बातम्या