फलंदाजांनी गोलंदाजांना 'फेल' ठरविले : रहाणे 

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

इंग्लंड दौऱ्यासाठी एक संघ म्हणून आम्ही चांगली तयारी करून आलो होतो. गोलंदाजांनी त्यांची मेहनत मैदानात उतरवली. पण, फलंदाजी कर्णधार कोहलीखेरीज अन्य कुणी धावाच करू शकले नाहीत.

लंडन : इंग्लंड दौऱ्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अपेक्षित होत असताना फलंदाज त्यांना साथ देण्यास कमी पडले, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने व्यक्त केले. 

इंग्लंड दौऱ्यासाठी एक संघ म्हणून आम्ही चांगली तयारी करून आलो होतो. गोलंदाजांनी त्यांची मेहनत मैदानात उतरवली. पण, फलंदाजी कर्णधार कोहलीखेरीज अन्य कुणी धावाच करू शकले नाहीत. जबाबदारी आणि परिस्थितीनुसार खेळण्यात गोलंदाज कमी पडले.'' कर्णधार कोहली आणि त्याच्या फलंदाजीतील फॉर्मबद्दल रहाणेने त्याची स्तुती केली. तो म्हणाला, ""विराटने ज्या पद्धतीने स्वतःला तयार केले आणि नंतर जी कामगिरी करून दाखवली ती कमाल होती. इंग्लंडला जाताना आणि आल्यावर बाहेरून विराटविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, विराटने त्याकडे दुर्लक्ष करताना त्यांना आपल्या बॅटने उत्तर दिले.'' 

यजमान संघ नेहमीच वरचढ असतो. त्यामुळे परदेशात खेळताना वर्चस्व साधण्याची संधी मिळाली की ती लगेच साधायची असते, असे सांगून रहाणे म्हणाला, ""परदेशात यजमान खेळाडू संधी देत नाहीत आणि ती मिळाली, तर संधी सोडायची नसते. प्रत्येक सत्रात वर्चस्व राखले तरच परदेशात वर्चस्व मिळू शकते. त्याचबरोबर इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी दिलेले योगदान निर्णायक ठरले. गोलंदाजांनीही भारतीय फलंदाज संयमाने खेळत असताना टप्पा आणि दिशा चुकवली नाही.'' 


​ ​

संबंधित बातम्या