मालिका गमावली असली तरी जिद्दीने उतरू : रवी शास्त्री

सुनंदन लेले
Wednesday, 5 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन वेळा हातात आलेला विजयाचा घास आपण घेऊ शकलो नाही, याची खंत शास्त्री यांना वाटत होती.

ओव्हल : मालिकेतील पाचवा कसोटी सामन्याच्या तयारीला सुरवात झाली असून, पहिल्या सराव सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंडला केवळ चांगली लढत दिल्याचे नाही, तर त्यांच्याविरुद्ध विजय मिळविल्याचे समाधान मिळायला हवे,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन वेळा हातात आलेला विजयाचा घास आपण घेऊ शकलो नाही, याची खंत शास्त्री यांना वाटत होती.

चौथ्या कसोटीत पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात आलेले अपयश हेच पराभवाचे कारण होते, असे सांगून शास्त्री म्हणाले, "पहिल्या डावात चिवट फलंदाजी अपेक्षित होती. मोठी आघाडी नक्कीच निर्णायक ठरली असती. जम बसलेल्या फलंदाजांनी मोठी खेळी करायला हवी होती. पुजाराने ती केली. पण, अन्य फलंदाजांचे काय ? मालिका गमावली म्हणून भारतीय हरलेल्या भावनेने पाचव्या कसोटीस मैदानात उतरणार नाहीत, तर चुका सुधारून सर्वोत्तम कामगिरीसाठी आमचे खेळाडू प्रयत्नशील राहतील.'' 
 


​ ​

संबंधित बातम्या