आमच्यावरील विश्‍वास कमी होऊ देऊ नका: विराट कोहली

वृत्तसंस्था
Wednesday, 15 August 2018

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतील पराभवानंतर माजी खेळाडूंपाठोपाठ पाठीराख्यांनीही टीम इंडियावर चौफेर टीका केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीची झोप उडाली आहे. आत्तापर्यंत नेहमीच पाठीशी उभे राहिलेले असंख्य चाहते असेच खंबीरपणे साथ देत राहोत, यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेत भावनिक आवाहन केले आहे. 

"आम्ही कधी विजय मिळवतो, तर कधी आम्ही शिकत असतो. आमच्यावरचा विश्‍वास कधी कमी होऊ देऊ नका. तुमचा हा विश्‍वास आम्ही कधी तोडणार नाही, याची खात्री बाळगा', अशा प्रकारचे भावनिक ट्विट विराटने केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामने अजून शिल्लक आहेत. मालिका जिंकायची असेल, तर भारताला हे तिन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. 

भारतीय संघ सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे; परंतु लॉर्डसवर झालेल्या कसोटीतील खेळ फारच सुमार झाल्यामुळे विराटसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर विराटने ट्विटवरून पाठीराख्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारतीय संघाच्या या अपयशात फलंदाजांनी घोर निराशा केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दोन महिने इंग्लंडमध्ये राहूनही स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर त्यांची दाणादाण उडत आहे. फलंदाजीचे तंत्र कमजोर आहे, असे मला वाटत नाही. मानसिकता भक्कम करण्याची गरज आहे, असे मत विराटने लॉर्डस कसोटीतील पराभवानंतर सांगितले होते.

संबंधित बातम्या