पाच गोलंदाज हवेतच : विराट कोहली

सुनंदन लेले
Thursday, 30 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून (गुरुवार) सुरवात होत आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिके 2-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. सामन्यापूर्वी कोहली म्हणाला, की एजेस बाऊलची खेळपट्टी बघता संघात चार वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज असेल. म्हणजेच गेल्या सामन्यातील संघात बदल केला जाणार नाही.

साउदम्पटन : कसोटी सामना जिंकायची योजना आखताना समोरच्या संघाचे 20 फलंदाज योग्य वेळेत बाद कसे करता येईल याचा विचार पहिल्यांदा करावा लागतो. आम्ही नेहमी सकारात्मक क्रिकेट खेळून सामना कसा जिंकता येईल हेच मनात ठेवत असल्याने संघातील गोलंदाजांचे महत्त्व वाढते म्हणून कसोटी सामन्यात उतरताना 5 गोलंदाज संघात हवेतच, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून (गुरुवार) सुरवात होत आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिके 2-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. सामन्यापूर्वी कोहली म्हणाला, की एजेस बाऊलची खेळपट्टी बघता संघात चार वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज असेल. म्हणजेच गेल्या सामन्यातील संघात बदल केला जाणार नाही.

इंग्लंड संघात दोन बदल : ज्यो रुट
इंग्लंड संघात ऑली पोपच्या जागी मोईन अली आणि ख्रिस वोकसच्या जागी सॅम करन संघात परत येणार आहे. वोक्सला दुखापत झाली आहे आणि संघात समतोल आणायच्या उद्देशाने मोईन अलीला संघात जागा मिळेल. त्याला अजून एक कारण असे आहे की बेन स्टोकस 100% तंदुरुस्त नाही. तो संपूर्ण ताकदीने दीर्घकाळ गोलंदाजी करेल असे वाटत नाही. म्हणून सॅम करनला घेण्याचा विचार आम्ही केला आहे. तसेच बोटाला दुखापत झालेला जॉनी बेअरस्टो संघात निव्वळ फलंदाज म्हणून खेळेल. पराभव स्वीकारल्यावर किंवा खराब कामगिरी एका सामन्यात झाल्यावरही इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन करून दाखवलेले आहे. चौथ्या कसोटीत तसेच करायचा आमचा निर्धार आहे.

​ ​

संबंधित बातम्या