भारतीय फलंदाजांचे पुन्हा लोटांगण; इंग्लंड वरचढ

सुनंदन लेले
Saturday, 8 September 2018

लंडन : इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघाला सर्वात जास्त त्रास इंग्लंडचे शेपूट वळवळण्याचा झाला आहे. वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करून प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवतात आणि मग डाव संपवण्याची अपेक्षा असताना इंग्लिश फलंदाजीचे शेपूट वळवळते. 89 धावा करणार्‍या जोस बटलरने 7 बाद 181 धावसंख्येवरून तळातल्या फलंदाजांना हाताशी धरत इंग्लंडची धावसंख्या 332 पर्यंत ताणली तेव्हा हेच बघायला मिळाले. फलंदाजी करताना कोहलीसह तीन भारतीय खेळाडू जम बसवून बाद झाल्यामुळे भारताला दुसर्‍या दिवसाचा खेळ संपताना 6 बाद 174 धावांवर समाधान मानावे लागले. अजून 158 धावांनी भारतीय संघ मागे असल्याने दडपणाचे ओझे कायम आहे.

चहापानानंतरच्या खेळात मैदानावर क्रिकेटची चकमक बघायला मिळाली. जम बसलेला लोकेश राहुल आणि पुजारा प्रत्येकी 37 धावा करून बाद झाले. कोहली पायचित असल्याचे जोरदार दाद पंच धर्मसेनाने फेटाळून लावल्यावर अँडरसनने तोंड उघडले. एका सेकंदात त्याचे रूपांतर बोलाचालीत झाले कारण जीमी अँडरसन नुसता कोहलीला नव्हे तर धर्मसेनाला उद्देशून काहीतरी बरळला. अँडरसनने पुजारा आणि रहाणेला ठेवणीतला आउटस्विंग चेंडू टाकून बाद केले. खंबीर उभा राहिला एकटा विराट कोहली. गोलंदाजांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देत कोहलीने 49 धावा केल्या होत्या. बेन स्टोकसचा चेंडू मारायच्या प्रयत्नात कोहलीचा झेल ज्यो रुटने पकडला आणि समस्या परत उभ्या झाल्या. पदार्पण करणार्‍या हनुमा विहारीने धीराने फलंदाजी करून 25 धावा केल्या. दुसर्‍या दिवस अखेरीला भारताने 6 बाद 174 असा टप्पा गाठला म्हणजेच अजून 158 धावांनी भारतीय संघ पहिल्या डावात मागे आहे. 

वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करून प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवतात आणि मग डाव संपवण्याची अपेक्षा असताना शेपूट वळवळते. दुसऱ्या दिवशी हेच घडले. 7 बाद 181 वरून तळातल्या फलंदाजांना हाताशी धरत बटलरने अंत पाहिला. त्याच्या 89 धावा इंग्लंड संघाला तारून गेल्या.

खेळ चालू होताना इंग्लंडच्या उरलेल्या तीन फलंदाजांना बाद करायला भारतीय गोलंदाज सापळा रचणार होते. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चेंडू जरा चांगला बॅटवर यायला लागला. बटलरने इतर फलंदाजांप्रमाणे टुकूटुकू फलंदाजी केली नाही. विराटने क्षेत्ररचना पांगवून मोठी चूक केली. बटलरने मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पटापट जमा केल्या. बुमराने रशिदला बाद केल्यावर ब्रॉडने बटलरला उत्तम साथ दिली. पहिल्या दोन तासांच्या खेळात इंग्लंडने 100 पेक्षा जास्त धावा वाढवून अडचणीतून मार्ग काढला. भारतीय गोलंदाजांनी खूप वेळा फलंदाजांना चकवले; पण नशिबाने चेंडू बॅटची कड काही घेत नव्हता. 

उपहारानंतर जडेजाला हवेतून फटका मारताना ब्रॉडचा उडालेला कठीण झेल राहुलने मागे पळत जात सूर मारत मस्त पकडला. त्यानंतर बटलरने बॅटचा वापर तलवारीसारखा करत झपाट्याने धावा वाढवल्या. 89 धावा करून शेवटी बटलरला जडेजाने बाद केले आणि इंग्लंडचा डाव 332 धावांवर संपला. जडेजाने 4 आणि बुमरा- ईशांतने प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले. खूप चांगली गोलंदाजी करून मोहंमद शमीची पाटी कोरडी राहिली ज्याचे वाईट वाटले. 

​ ​

संबंधित बातम्या