रिचर्डस यांचा आशीर्वाद अन् कोहलीचे इंग्लंडमध्ये शतक

सुनंदन लेले
Thursday, 2 August 2018

दोन वर्ष विराटने ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण बघताना मन भरून आले. २०१४ च्या दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यात मिळून जेमतेम १३४ धावा जमा करू शकणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४९ धावांची खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. २२ चौकार आणि एका शतकारासह विराटने उभारलेली खेळी भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढून गेली.

विराट कोहलीचे झुंजार शतक; 

बर्मिंघम : मला २०१६ सालातला प्रसंग आठवतो आहे. सर विव्ह रिचर्ड्स यांना त्यांच्या अँटिग्वामध्ये विराटसह भेटलो होतो. त्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकले होते. "विराट मी तुला जेवण दिले आणि तू आमच्याच संघाला धोपटून काढलेस हे बरोबर आहे का", सर विव्ह रिचर्ड्स म्हणाले होते. 

"सर मला इथे नाही २०१८ सालातील इंग्लंड दौऱ्यात धावा काढायच्या आहेत", विराट म्हणाला होता. "क्रिकेट देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल", सरांनी आशीर्वाद दिला होता. 

दोन वर्ष विराटने ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण बघताना मन भरून आले. २०१४ च्या दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यात मिळून जेमतेम १३४ धावा जमा करू शकणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४९ धावांची खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. २२ चौकार आणि एका शतकारासह विराटने उभारलेली खेळी भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढून गेली.

विजय आणि राहुल एकामागोमाग एक बाद झाल्यावर कोहली मैदानात उताराला तेंव्हा अँडरसनने गोलंदाजी मागून घेतली. मग प्रेक्षकांना कोहली - अँडरसन मधील क्रिकेट द्वंद्व अनुभवायला मिळाले. गेल्या दौऱ्यात अँडरसनने विराटला चार वेळा बाद केले होते. नेहमी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कोहलीला अँडरसनने टाकलेल्या 72% चेंडूवर धाव काढता आली नाही. अहंकाराला बाजूला सरकावत विराटने अँडरसनच्या सातत्यपूर्ण माऱ्याचा आदर केला. सात प्रमुख खेळाडू बाद झाल्यावर विराटने एकदम खेळाची लय बदलली.

विराटला त्याच्या कष्टाचे फळ शतक पूर्ण करून मिळाले. मैदानावरच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत विराटला मानवंदना दिली. तळातील फलंदाजांना हाताशी धरत विराटने तब्बल शंभर पेक्षा जास्त धावांची भर टाकली. शेवटच्या विकेटकरता विराटने ५७धावा जोडल्या ज्यात उमेश यादवचा वाट एक धावेचा होता ह्यावरून विराटने काय कमाल केली ह्याचा अंदाज लागू शकतो.  

विराटच्या मोठ्या शतकी खेळीमुळेच इंग्लंडला पहिल्या डावात १३ धावांची आघाडी मिळाली आणि भारताचे पहिल्या कसोटी सामन्यातील आव्हान कायम राहिले. 

संबंधित बातम्या