किंग कोहलीनं चक्क आपल्या 'लाडल्या'लाच केलं ट्रोल!

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल चांगलेच अडचणीत सापडले होते. याची आठवण करुन देत नेटकऱ्यांनी राहुलला ट्रोल केलं. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने मार्चपासून ओस पडली आहेत. इंग्लंडच्या मैदानातून क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन आणण्याचे प्रयत्न सुरु असले तरी भारतीय संघ मैदानात कधी उतरणार? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर्स सरावासाठी मैदानात उतरले असताना भारतीय संघातील मोजके खेळाडू सोडले तर अनेकजण अजूनही लॉकडाउनमध्येच आहेत. मैदानापासून दूर असतानाही भारतीय क्रिकेटर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. 
नुकताच लोकेश राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला होता. कॉफी घेत असताना शेअर केलेल्या फोटोमुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल चांगलेच अडचणीत सापडले होते. 2019 च्या जानेवारी महिन्यात करण जोहरच्या लोकप्रिय कार्यक्रमात या जोडगोळीनं वादग्रस्त वक्तव्ये केली होती. बीसीसीआयने त्यांना चांगलेच सुनावले होते. हा मुद्दा उकरुन काढत नेटकऱ्यांनी लोकेश राहुलची शाळा घेतली. यात कर्णधार विराट कोहलीही सहभागी झाला. 'कप गंदा है! अशी कमेंट विराटने राहुलच्या फोटोवर केल्याचे पाहायला मिळाले. कर्णधाराचा लाडका शिलेदार असलेल्या राहुलने विराटच्या कमेंटवर कोणताही विलंब न करता प्रतिक्रिया दिलीय. 'दिल साफ है! या शब्दात त्याने कप स्वच्छ नसला तरी मन निर्मळ असल्याचे म्हटले आहे.  

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन

लोकेश राहुल आणि विराट कोहली या वर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यावर एकत्रित मैदानात उतरले होते. त्यानंतर  भारतीय संघाने एकही मालिका खेळलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ  भारत दौऱ्यावर आला होता. पण पहिला सामना पावसाच्या व्यत्यायामुळे वाया गेल्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर न खेळताच मायदेशी परतावे लागले होते.  भारतीय संघ वर्षाच्या अखेरिस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशात तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पण कोरोनामुळे या दौऱ्याबाबतही संभ्रमाचे वातावरण दिसते.  


​ ​

संबंधित बातम्या