गेल्या आठ महिन्यात आयुष्यात खूप भोगले : महंमद शमी

सुनंदन लेले
Tuesday, 28 August 2018

‘‘जेम्स अँडरसनला गोलंदाजी करताना बघून मी बरेच काही शिकतो आहे. वेग नसला तरी केवळ टप्पा दिशा आणि त्याला स्वींग गोलंदाजीची साथ असली की गोलंदाज काय करू शकतो हे अँडरसनला बघून समजते’’, अँडरसनला मानवंदना देताना शमी म्हणाला.

साउदमपटन : ‘‘गेल्या आठ महिन्यात मी खूप भोगले. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींनी मी हादरून गेलो होतो, अस्वस्थ झालो होतो. मग मी विचार केला की मी कशामुळे इथपर्यंत पोहोचलो... क्रिकेटमुळे. ठरवले मग की लक्ष क्रिकेटवरच केंद्रित करायचे. देशाकरता खेळण्यापेक्षा काहीच मोठे नसते. माझ्या संघाकरता जीव लावून खेळणे हेच मला महत्त्वाचे वाटले आणि मी नकारात्मक विचारांमधून बाहेर पडलो’’, महंमद शमी सांगत होता.

‘‘जेम्स अँडरसनला गोलंदाजी करताना बघून मी बरेच काही शिकतो आहे. वेग नसला तरी केवळ टप्पा दिशा आणि त्याला स्वींग गोलंदाजीची साथ असली की गोलंदाज काय करू शकतो हे अँडरसनला बघून समजते’’, अँडरसनला मानवंदना देताना शमी म्हणाला.

चौथ्या सामन्याकरता कशी खेळपट्टी तयार केली जाईल असे विचारले असता शमी म्हणाला, की खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असेल यात शंका नाही. एक चांगली बाब अशी वाटते, की आता कोणीही संघ भारतीय संघासमोर खेळताना एकदम वेगवान गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी बनवताना दहा वेळा विचार करेल. आपला माराच तसा ताकदवान आहे. भारतीय क्रिकेट संघाचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान मारा असे वर्णन आमच्या टोळीचे केले जाते तेव्हा बरे वाटते.

​ ​

संबंधित बातम्या