TikTok वर ट्रेडिंग असणाऱ्या वॉर्नरची भारतातील अ‍ॅप बंदीवर पहिली प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
Saturday, 4 July 2020

यापूर्वी  TikTok अ‍ॅपवरील बंदीनंतर  भारतीय फिरकीपटून रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची फिरकी घेतली होती. अश्विनने आता तुझं काय होणार? अशा मजेशीर ट्विट अश्विनने केले होते.

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर केंद्र सरकारने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या TikTok अ‍ॅपसह 59 चिनी कंपन्यांच्या अ‍ॅपवर बंदीचा घातली. लॉकडाऊनच्या काळात खेळाची मैदानावर शांतता पसरली असताना TikTok अ‍ॅपच्या माध्यमातून वॉर्नर चांगलाचा चर्चेत आला होता. वॉर्नर आपली पत्नी कँडी आणि चिमकलीसह अल्लू अर्जूनच्या गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर अनेक बॉलिवूड गाण्याचा आधार घेत त्याने लॉकडाउनच्या काळात अल्पावधीत अनेक चाहत्याने आपल्याकडे आकर्षित करुन घेतले. वॉर्नरचा TikTok अ‍ॅप वरील शॉ ला हिट करण्यात भारतीयांनीही दिलेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरला.  

 क्रिकेटशिवाय इतर खेळाला 'अच्छे दिन' येणार; यासाठी सरकारने आखलाय मास्टर प्लॅन

TikTok अ‍ॅपवरील भारतातील बंदीवर वॉर्नरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर त्याने इन्टाग्रामच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणालाय की, TikTok अ‍ॅपसंदर्भातील भारतातील बंदीवर मी काहीही करु शकत नाही. हा भारत सरकारने घेतलेला निर्णय आहे. भारतीयांनी सरकारच्या या निर्णयाचा सन्मान करायला हवा. यापूर्वी  TikTok अ‍ॅपवरील बंदीनंतर  भारतीय फिरकीपटून रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची फिरकी घेतली होती. अश्विनने आता तुझं काय होणार? अशा मजेशीर ट्विट अश्विनने केले होते.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळ पूर्णपणे स्थगित आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचे नेतृत्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने TikTok वर धमाल माजवली होती. त्याचे व्हिडिओ तुफान व्हायरलही झाले होते. 

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात अनेक क्रिकेटर्सं टिकटॉकवर लॉगइन केल. यात वॉर्नरची एन्ट्रीही धमाकेदार आणि लक्षवेधी ठरली होती. बॉलिवूड आणि टॉलीवूडच्या गाण्यांसह नृत्याचे व्हिडिओ शेअर करुन त्याने सर्वांचे लक्ष वेधले. बॉलिवूडमधील 'हाउसफुल 4' या अक्षय कुमारच्या चित्रपटातील 'बाला...' या गाण्यावरही तो थिरकल्याचे पाहायला मिळाले. अक्षय कुमारलाही मागे टाकले, अशा आशयासह त्याने इन्टावरुन टिकटॉकवरील आपला व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्यावर इमोजीच्या माध्यमातून रिअ‍ॅक्शन दिली. यावेळी रिप्लाय देताना वॉर्नरने विराटलाही या अ‍ॅप जॉइन करण्याचा सल्ला दिला होता. 


​ ​

संबंधित बातम्या