फेडरेशन करंडक टेनिस : अंकिताच्या दोन विजयाने  भारताची थायलंडवर मात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 February 2019

अस्ताना (कझाकस्तान), ता. 7 : दुबळ्या थायलंडच्या धडाकेबाज सुरवातीनंतर अंकिता रैनाने आपली एकेरी आणि दुहेरीची लढत जिंकून भारताला फेडरेशन करंडक टेनिस स्पर्धेत 2-1 असा विजय मिळवून दिला. 
पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताकडून कामरान कौर थंडी हिला पराभवाचा सामना करावा लागला. क्रमवारीत 211व्या स्थानावर असणाऱ्या कामरानला थायलंडच्या नुदिंदा लुआंगनम हिच्याकडून 2-6, 6-3 3-6 असा पराभव पत्करावा लागला. नुदिंदा जागतिक क्रमवारीत 712व्या स्थानावर आहे. क्रमवारीत सरस असूनही कामरानचा पराभव भारतासाठी धक्कादायक ठरला. 

या पराभवानंतर कोर्टवर उतरलेल्या देशातील अव्वल मानांकित अंकिता रैनाने भारताच्या आशा उंचावल्या. अर्थात, त्यांना पहिला सेट गमवावा लागला होता. हा सेट गमाविल्यानंतरही अंकिताने आपला खेळ उंचावून दुसऱ्या एकेरीच्या लढतीत थायलंडच्या पीआंगटर्न प्लिपुएच हिचा 6-7(3-7), 6-2, 6-4 असा पराभव केला.

एकेरीच्या दोन्ही लढतीनंतर 1-1 अशी बरोबरी असताना भारतीय संघाचा नॉन प्लेयिंग कर्णधार विशाल उप्पल याने एकेरीतील दोन्ही खेळाडूंना दुहेरीसाठी उतरविण्याचा निर्णय घेतला. अंकिता आणि कामरान या दोघींनी आपला अनुभव पणाला लावून संघर्षपूर्ण लढतीत थायलंडच्या पीआंगटर्न आणि नुदिंदा यांचा 6-4, 6-7(6-8), 7-5 असा पराभव करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत दोन तास 38 मिनिटे चालली. 
भारताच्या विजयानंतर अंकिता म्हणाली,""प्रतिस्पर्धी चिवट आहे हे माहीत होते. तिच्याविरुद्ध यापूर्वी मी एक विजय मिळविला आहे. एकदा हरलेदेखील आहे. मला मानसिकदृष्ट्या कणखर राहणे आवश्‍यक होते. अर्थात, मला हे कधी आवडत नाही. माझ्यासाठी कसोटीचा प्रसंग होता. यात मी यशस्वी ठरले. यामुळे भारताच्या विजयाचा अधिक आनंद झाला.''

कर्णधार विशाल उप्पल याने भारतीय खेळाडू गुणवत्तेनुसार खेळल्या नाहीत; पण पिछाडीवरून विजय मिळविताना त्यांनी दाखविलेली जिगर जबरदस्त होती. थायलंडच्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ केला; पण आमच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत झुंज देऊन विजय मिळविला.'' भारताचा पुढील सामना शुक्रवारी कझाकस्तानशी होणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या