मयांक अगरवालचे द्विशतक

वृत्तसंस्था
Monday, 6 August 2018

बंगळूर : भारत अ संघाने फलंदाजीचे जबरदस्त प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिका अ संघावर दुसऱ्या दिवशीही वर्चस्व राखले. मयांक अगरवालचे द्विशतक, पृथ्वी शॉचे शतक आणि त्यांच्या 277 धावांच्या सलामीने भारत अ संघाने दुसऱ्या दिवस अखेरीस 2 बाद 411 धावा केल्या. 

पृथ्वी शॉ 196 चेंडूंत 136 धावा काढून बाद झाला. पण, त्यानंतर अगरवालने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेताना शानदार द्विशतकी खेळी करून भारत अ संघाची बाजू भक्कम केली. खेळ थांबला तेव्हा अगरवाल 220 धावांवर खेळत होता. त्यापूर्वी भारत अ संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 246 धावांत संपुष्टात आणला. महंमद सिराजने 56 धावांत 5 गडी बाद केले. 

त्यानंतर भारतीय फलंदाजांना पाहुण्यांचे गोलंदाज रोखू शकले नाहीत. अगरवाल आणि शॉच्या फटकेबाजीने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कुचकामी ठरवली. भारताच्या डावात एकूण 58 चौकार आणि पाच षटकार लगावले गेले. यात अगरवाल एकट्याने 31 चौकार आणि चार षटकार ठोकले. शॉने 20 चौकार आणि एका षटकारासह आपली खेळी सजवली. 

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका अ सर्वबाद 246 (रुडी सेकंड 94, सारेल एर्वी 47, महंमद सिराज 5-56, नवदीप सैनी 2-47, रजनीश गुरबानी 2-47) भारत अ 2 बाद 411 (मयांक अगरवाल खेळत आहे 220, पृथ्वी शॉ 136)

संबंधित बातम्या