भारताला झटका; हार्दिक स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर

वृत्तसंस्था
Wednesday, 19 September 2018

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवार) सामना होत आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध टिच्चून गोलंदाजी केली.

दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करतानाच अचानक कोसळला आणि त्याला चक्क स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवार) सामना होत आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध टिच्चून गोलंदाजी केली.

हार्दिक 18 व्या षटकात गोलंदाजी करत असताना चेंडू टाकल्यानंतर मैदानातच कोसळला. त्याच्या कमरेला दुखापत झाल्याचे समजत असून, संघाच्या फिजिओंना त्याला उठणेही शक्य नसल्याने स्ट्रेचर बोलावून मैदानाबाहेर न्यावे लागले. भारतीय संघाला हा मोठा झटका असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या संघातील समावेशबाबत माहिती मिळू शकली नाही.

​ ​

संबंधित बातम्या