'DRS=धोनी रिव्ह्यू सिस्टीम' हे पुन्हा एकदा स्पष्ट

वृत्तसंस्था
Sunday, 23 September 2018

धोनीने आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी, 325 एकदिवसीय आणि 93 ट्वेंटी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे त्याच्या अऩुभवाचा भारतीय संघाला कायम फायदा झालेला आहे. धोनीच्या अनुभवाचा फायदा भारताला आठव्या षटकातच झाला. 

दुबई : भारताचा अनुभवी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला डीआरएस म्हणजेच धोनी रिव्ह्यू सिस्टीम का म्हटले जाते हे आज (रविवार) पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्पष्ट झाले.

आशिया करंडकात सुपर फोरमध्ये आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकचा सलामीवीर इमाम उल-हक याला युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पंचांनी पायचीत नाबाद दिले होते. पण, धोनीच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मग काय धोनीने रिव्ह्यू घेतला आणि वाया गेला असे क्वचितच झाले आहे. यावेळीही तसेच झाले धोनीने घेण्यास सांगितलेल्या रिव्ह्यूवर पंचांनी इमामला पायचीत बाद ठरविले. त्यामुळे डीआरएस म्हणजेच धोनी रिव्ह्यू सिस्टीम हेच योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

धोनीने आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी, 325 एकदिवसीय आणि 93 ट्वेंटी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे त्याच्या अऩुभवाचा भारतीय संघाला कायम फायदा झालेला आहे. धोनीच्या अनुभवाचा फायदा भारताला आठव्या षटकातच झाला. 

संबंधित बातम्या