विराट सेनेसमोर खडतर आव्हान; इंग्लंडकडे 233 धावांची आघाडी

सुनंदन लेले
Saturday, 1 September 2018

साउदम्पटन : इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरच्या 69 धावांच्या खेळीमुळे इंग्लंड संघाची दुसर्‍या डावातील आघाडीची मुळे खोलवर रुजायला मदत झाली. बाकी इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीला बिचकून तोंड देत असताना ज्यो रुट, बटलर आणि सॅम करनने चांगली फलंदाजी करून दुसर्‍या डावातील आघाडीची संख्या 233 वर नेली. 69 धावा करणार्‍या जोस बटलरला सॅम करनने नाबाद 37 धावा करून सुंदर साथ दिल्याने तिसर्‍या दिवशी अखेरीला इंग्लंडला 8 बाद 260 मजल मारायला मदत केली. संघात जातिवंत अष्टपैलू खेळाडू असल्याचा अडचणीतून मार्ग काढताना त्याचा मोठा फायदा इंग्लंडला झालेला दिसला.

साउदम्पटन : इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरच्या 69 धावांच्या खेळीमुळे इंग्लंड संघाची दुसर्‍या डावातील आघाडीची मुळे खोलवर रुजायला मदत झाली. बाकी इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीला बिचकून तोंड देत असताना ज्यो रुट, बटलर आणि सॅम करनने चांगली फलंदाजी करून दुसर्‍या डावातील आघाडीची संख्या 233 वर नेली. 69 धावा करणार्‍या जोस बटलरला सॅम करनने नाबाद 37 धावा करून सुंदर साथ दिल्याने तिसर्‍या दिवशी अखेरीला इंग्लंडला 8 बाद 260 मजल मारायला मदत केली. संघात जातिवंत अष्टपैलू खेळाडू असल्याचा अडचणीतून मार्ग काढताना त्याचा मोठा फायदा इंग्लंडला झालेला दिसला.

चहापाना नंतरच्या खेळावर जोस बटलरचा ठसा होता. बेन स्टोकस अश्विनला बाद झाल्यावर बटलरने कठीण होत जाणार्‍या खेळपट्टीवर खूप सकारात्मक फलंदाजी केली. खास करून अश्विनला खेळताना बटलरने पदलालित्याचा वापर करत मारलेले फटके प्रेक्षणीय होते. दिवसभर इंग्लंडचा किमान एक डावखुरा फलंदाज मैदानावर हजर राहिल्याने भारतीय गोलंदाजांना टप्पा दिशा राखणे आव्हानात्मक गेले. संघात 7 खेळाडू फलंदाजी डावखुरी करत असल्याचा मोठा फायदा इंग्लंडला झाला. गरम हवेने मातीतील पाण्याचा अंश कमी होत जातो आहे. पॅव्हेलीयनच्या बाजूने खेळपट्टीवरील माती मोकळी होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरा नवा चेंडू घेतल्यावर ईशांत शर्माला बटलरला बाद करणे जमले. बटलरच्या 69 धावांचा मोठा परिणाम झाला. पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करून संघाला अडचणीतून बाहेर काढणार्‍या सॅम करनने दुसर्‍या डावातही तगडी फलंदाजी केली.  

तिसऱ्या दिवशी पहिला गडी बाद करायला भारतीय गोलंदाजांना किंचित वेळ लागला. कुक-जेनिंग्ज जोडीने पहिला अर्धा तास सावध खेळ केला. बुमराने कुकला बाहेर जात असलेल्या चेंडूवर झेल द्यायला भाग पाडले. कुकपाठोपाठ राहुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची बढती मिळालेल्या मोईनचा झेल जमिनीलगत पकडला. रूटला सुरवातीला खेळणे कठीण गेले. नजर बसल्यावर रूटने मोकळ्या जागेत चेंडू मारून धावफलक हलता ठेवला. दोन तास कसाबसा तग धरलेला जेनिंग्ज उपहाराअगोदर शमीला बाद झाला. पहिल्या दोन तासांत भारताला तीन फलंदाजांना बाद करता आले होते.
दुपारच्या सत्राची सुरवात भारताकरिता भन्नाट झाली. शमीने जॉनी बेअरस्टॉचा स्टंप पहिल्याच चेंडूवर उधळून लावला. दडपण वाढत असताना रूटने केलेली फलंदाजी लक्षणीय होती. रूटला स्टोक्‍सने चांगली साथ दिली. एक तास दोघांनी चांगली फलंदाजी केली. 48 धावांवर खेळणारा रूट भारताकरिता पायात सलणारा काटा ठरू बघत असताना नाट्य घडले. स्टोक्‍सने चेंडू शमीकडे मारून चोरटी एकेरी धाव पळायला लागला. रूट धाव पळण्याबाबत साशंक होता. शमीने चेंडू अचूक स्टंपवर मारून रूटला मालिकेत दुसऱ्यांदा धावबाद केले.

भारतीय संघाला अपेक्षेपेक्षा जास्त यश न मिळायला अश्विनची धार नसलेली गोलंदाजी कारण ठरली. डावखुऱ्या फलंदाजांना अश्विन जास्त अडचणीत टाकू शकला नाही. खेळपट्टी थोडी साथ फिरकीला देत असून, आणि 21 षटके टाकूनही अश्विनला एकही बळी घेता आला नाही.

ये तेरेही गाडीमें बैठेगा! 
चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवरील स्टंपमधे लावलेल्या माईकमधून खेळाडूंची चालू असलेली बडबड ऐकून हसायला येत होते. रूटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे टाळून मोईनला पाठवले त्यावरून विराटने रूट फलंदाजीला आल्यावर लगेच विचारले, "मैदानावर फलंदाजी करताना तीन धावा पळणे चांगले असते तू तिसऱ्या क्रमांकावरून का पळालास? नंतर ईशांत गोलंदाजी करत असताना विराटने धमाल केली. जेनिंग्जला ईशांत मारा करत असताना विराट म्हणाला, ये तेरेही गाडीमें बैठेगा. समालोचन करणाऱ्या स्थानिक लोकांना विराटचे हिंदी भाषेतील बोलणे समजत नव्हते आणि हरभजन सिंग ते ऐकून हसत होता.


​ ​

संबंधित बातम्या