पुजारा, कोहलीची अर्धशतके; भारताला मोठी आघाडी

सुनंदन लेले
Monday, 20 August 2018

नॉटींगहॅम कसोटी जिंकण्याकडे ठोस वाटचाल करायच्या पक्क्या इराद्याने कोहली-पुजारा तिसर्‍या दिवशी ट्रेंट बीज मैदानात उतरले. अँडरसनने एकदम शिस्तबद्ध मारा करून धावांना लगाम घातला. पुजाराला एक जीवदान लाभले जेव्हा जेनिंग्जला कठीण झेल पकडता आला नाही. कोहलीविरुद्ध दोन पायचित असल्याची मागितलेली दाद अपयशी ठरली. 

ट्रेंट ब्रीज :  चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने भारतीय संघाची आघाडी इंग्लंडच्या आवाक्याबाहेर करून ठेवायला केलेली टिच्चून फलंदाजी हेच तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळाचे वैशिष्ट्य राहिले. ज्यो रुटने सर्व पर्याय वापरून बघूनही 83 धावांची भागीदारी ते तोडू शकले नाहीत. तिसर्‍या दिवशी उपहाराकरता खेळ थांबला असताना भारताच्या नावासमोर 2 बाद 194 धावसंख्या दिसत होती. पुजारा - कोहली अर्धशतके काढून नाबाद परतले आणि एकूण आघाडी 362 धावांची झाली होती.

नॉटींगहॅम कसोटी जिंकण्याकडे ठोस वाटचाल करायच्या पक्क्या इराद्याने कोहली-पुजारा तिसर्‍या दिवशी ट्रेंट बीज मैदानात उतरले. अँडरसनने एकदम शिस्तबद्ध मारा करून धावांना लगाम घातला. पुजाराला एक जीवदान लाभले जेव्हा जेनिंग्जला कठीण झेल पकडता आला नाही. कोहलीविरुद्ध दोन पायचित असल्याची मागितलेली दाद अपयशी ठरली. 

दोन तास फलंदाज आणि गोलंदाज संयम तपासत होते. अचूक मारा करत असल्याने कोहली - पुजाराला मोठे फटके मारता येत नव्हते. हाती भरपूर वेळ असल्याने फलंदाज घाई करत नव्हते. त्यातही इंग्लंडला एक मोठा आघात सहन करावा लागला जेव्हा अँडरसनचा स्टंप मागे स्वींग झालेला चेंडू जॉनी बेअरस्टोच्या डाव्या हाताच्या बोटावर आदळला. कळवळत बेअरस्टोने मैदान सोडले. बटलरच्या रूपाने दुसरा विकेट किपर हजर होता ज्याचा फायदा इंग्लंडला झाला. 

उपहाराअगोदर स्वत: ज्यो रुटनेही भागीदारी तोडायला गोलंदाजी करून बघितली. ट्रेंट ब्रीजची खेळपट्टी स्वींग गोलंदाजीला जास्त साथ देत नसल्याने इंग्लंडचे गोलंदाज अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. दोन तासांच्या खेळात दोघा फलंदाजांनी विकेट जाऊन दिली नाही आणि 70 धावा जोडल्या. भारताच्या खात्यात आता 362 धावांची भक्कम आघाडी जमा झाल्याने तिसर्‍या कसोटीवरची पकड अजून मजबूत झाली आहे. उपहाराला खेळ थांबला तेव्हा कोहली 54 आणि पुजारा 56 धावांवर नाबाद परतले.  

संबंधित बातम्या