भारतीय फुटबॉल संघाचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय

वृत्तसंस्था
Monday, 6 August 2018

भारताच्या 20 वर्षांखालील फुटबॉल संघाने कोटिफ करंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात सहा वेळा विश्वविजेत्या अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय नोंदवला. 

मद्रिद : भारताच्या 20 वर्षांखालील फुटबॉल संघाने कोटिफ करंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात सहा वेळा विश्वविजेत्या अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय नोंदवला. 

फिफा विश्वकरंडकातील 20 वर्षांखालील सर्वात यशस्वी संघावर भारतीय संघाने 2-1 असा सनसनाटी विजय मिळवला. अर्जेंटिनाविरुद्द झालेल्या सामन्यात 54व्या मिनिटाला भारतीय संघातील एका खेळाडूला त्याने केलेल्या चुकीमळे बाहेर जावे लागले. त्यामुळे भारतीय संघाला हा संपूर्ण सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. 

 

भारतीय संघातील दिपक तांगरीने 41व्या मिनिटाला तर अन्वर अलीने 68व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.  

याआधी मुर्सिया आणि मॉरीटॅनियाविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता तर व्हेनेझुएलाविरु्दध बरोबरी साधली होती. भारतीय संघ अ गटात शेवटच्या स्थानावर आहे.    

या विजयामुळे फुटबॉल विश्वात भारतीय फुटबॉलला नक्कीच सन्मान मिळेल. या विजयासह आपल्यासाठी सर्वोत्तम संघाना सतत आव्हान देणारे दरवाजे उघडले गेले आहेत. 
- फ्लोईड पिंटो, 20 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचे मार्गदर्शक    
 

संबंधित बातम्या