आम्ही येतोय...तुम्ही तयार रहा ! डिसेंबर महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौरा गांगुलींकडून निश्चित

शैलेश नागवेकर
Sunday, 12 July 2020


विलगीकरणाच्या मोठा कालावधीमुळे खेळाडूंकडे निव्वल हॉटेलमध्ये रहाण्याशिवाय काहीच काम नसेल, हा काळ निराशाजन आणि कंटाळवाणा असतो म्हणून आम्ही विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे असे गांगुलींनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : आम्ही येतोय तुम्ही तयार रहा...असा संदेश देत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचा डिसेंबर महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौरा नक्की केला. आयपीएलबाबत अजून अनिश्चितता आहे, पण या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे. कोरोना महामारीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी भारताचा हा दौरा अर्थपूर्ण ठरणार आहे. कमीत कमी दिवसांचे विलगीकरण ठेवा, असे गांगुलींनी क्रिकेट ऑस्ट्रेलिला कळवले आहे. मेलबर्न या प्रमुख शहराचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आलेला आहे. 

गौतम गंभीर पुन्हा धोनीला भिडला..म्हणतो, धोनीने जिंकल्या ट्रॉफ्या पण संघ उभारला होता गांगुलीने

विलगीकरणाच्या मोठा कालावधीमुळे खेळाडूंकडे निव्वल हॉटेलमध्ये रहाण्याशिवाय काहीच काम नसेल, हा काळ निराशाजन आणि कंटाळवाणा असतो म्हणून आम्ही विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे असे गांगुलींनी स्पष्ट केले. मेलबर्नचा अपवाद वगळता उर्वरित ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड या देशांनी कोरोनावर मात केलेली आहे त्यामुळे आमच्या खेळाडूंसाठी विलगीकरणाचे दिवस कमी असले तर त्यांना लवकरात लवकर मैदानात उतरता येईल, असेही गांगुली म्हणाले. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असून ही मालिका सुरू होण्याअगोदर त्यांचे 14 दिवसांचे विलगीकरण करण्यात आले होते. 9 जून रोजी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला होता आणि पहिला कसोटी सामना जवळपास महिन्यानंतर म्हणजेज 8 जुलै रोजी सुरू झाला.

आव्हानात्मक दौरा

चार कसोटी सामन्यांचा हा ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल. दोन वर्षांपूर्वी आपण ऑस्ट्रेलियात खेळलेल्या संघापेक्षा यावेळचा त्यांचा सघ अधिक बलवान आहे. आपली फलंदाजी आणि गोलंदाजी भक्कम आहे, पण ऑस्ट्रेलियात जिंकायचे असेल तर फलंदाजी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, असे गांगुलींनी सांगितले.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा   आणि लाइकसह शेअर करायलाही विसरु नका  

धावांचे भक्कम पाठबळ हवे

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या देशांत आपण यशस्वी ठरलो तेव्हा 400-500 आणि 600 धावांही केलेल्या आहेत, असे मी विराट कोहलीला सांगितले असल्याचे गांगुली म्हणाले.

विराट कोहलीला संदेश
तु विराट कोहली आहेस, तुझा दर्जा फार उच्च प्रतिचा आहे. जेव्हा तु टीम इंडियाला घेऊन  मैदानात उतरतोस तेव्हा तुझ्याकडून जिंकण्याचीच अपेक्षा आम्ही सर्व जण करत असतो, ही मालिका नवा इतिहास रचणारी ठरू शकेल, अशा शब्दात गांगुलींनी विराटला संदेश दिला.


​ ​

संबंधित बातम्या