Asia Cup 2018 : कोहलीशिवायही भारतीय संघ सर्वोत्तमच : फहिम अश्रफ

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

Asia Cup 2018 : कोहलीशिवायही भारतीय संघ सर्वोत्तमच : फहिम अश्रफ

इस्लामाबाद : भारताचा कर्णधार विराट कोहलीशिवायही भारताचा एकदिवसीय संघ सर्वोत्तम असल्याचा दावा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू फहिम अश्रफ याने केले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, ''आशिया करंडकात भारतीय संघात त्यांचा कर्णधार विराट कोहली नसला तरीही भारतीय संघ सर्वोत्तम आहे. त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर शंभर टक्के सराव करत आहोत. आम्ही भारताविरुद्धचा सामना जिंकू याची मला खात्री आहे.'' 

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या अंतिम संघात स्थान मिळावे अशी फहिमची ईच्छा आहे. ''आशिया करंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत भारताविरुद्ध खेळणे हे प्रत्येक खेळाडू्चे स्वप्न असते, '' असे मत त्याने व्यक्त केले. 
 
आशिया करंडक स्पर्धेला 15 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. 
पाकिस्तान संघाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. 

संबंधित बातम्या