15 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला नाहीतर भारताचा पराभव निश्चित

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड भारतासमोर विजयासाठी 200 हून धावांचे लक्ष्य ठेवणार हे निश्चित असून, भारताला हा सामना जिंकण्यासाठी 15 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढण्याची गरज आहे. 

साउदम्पटन : चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड भारतासमोर विजयासाठी 200 हून धावांचे लक्ष्य ठेवणार हे निश्चित असून, भारताला हा सामना जिंकण्यासाठी 15 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढण्याची गरज आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. अन्यथा भारतीय संघाला 3-1 असा मालिकेत पराभव स्वीकारावा लागणार आहे. पण, चौथ्या कसोटीत विजय मिळविण्यासाठी भारतीय संघासमोर खडतर आव्हान आहे. या आव्हानाला फलंदाज कसे सामोरे जाणार हे उत्सुकतेचे असणार आहे.

कारण, भारतीय संघाने आशिया खंडाबाहेर 200 हून अधिक धावांचा पाठलाग करताना 15 वर्षांपूर्वी विजय मिळविलेला आहे. 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडिलेड कसोटीत भारताने दुसऱ्या डावात दोनशेहून अधिक धावांचा पाठलाग करत विजय मिळविला होता. आताही विराट सेनेला गांगुलीच्या संघासारखी कामगिरी करण्याची गरज आहे. भारतीय संघाला आतापर्यंत 61 वेळा 200 हून अधिक धावांचे लक्ष्य मिळालेले आहे. त्यामध्ये फक्त 3 सामन्यांत भारतीय संघाला विजय मिळविता आलेला आहे. यातील 36 सामन्यांत भारताचा पराभव झाला असून, 22 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करायची असेल तर सुपरविजय मिळविणे गरजेचे आहे.


​ ​

संबंधित बातम्या