राहुल, रिषभ लढले पण पराभवच पदरी; मालिका 4-1 ने गमाविली

सुनंदन लेले
Tuesday, 11 September 2018

लंडन : लोकेश राहुल आणि रिषभ पंतनी बहारदार शतके ठोकत भारतीय संघाचा पाचव्या कसोटीतील पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला. दुसर्‍या डावात संथ होत गेलेल्या ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचा फटका जसा भारतीय गोलंदाजांना बसला तसाच तो इंग्लिश गोलंदाजांनाही सहन करावा लागला. चहापानानंतर आदिल रशिदने दोनही शतकवीरांना बाद करून इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसर्‍या नव्या चेंडूवर तळातील फलंदाजी कोलमडली. 5 तास अथक प्रयत्न केल्यावर अखेर अँडरसननने शमीला बाद करून भारताचा दुसरा डाव 345 धावांवर संपवला आणि इंग्लंडने ओव्हल कसोटी सामना 118 धावांनी जिंकला.

लंडन : लोकेश राहुल आणि रिषभ पंतनी बहारदार शतके ठोकत भारतीय संघाचा पाचव्या कसोटीतील पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला. दुसर्‍या डावात संथ होत गेलेल्या ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचा फटका जसा भारतीय गोलंदाजांना बसला तसाच तो इंग्लिश गोलंदाजांनाही सहन करावा लागला. चहापानानंतर आदिल रशिदने दोनही शतकवीरांना बाद करून इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसर्‍या नव्या चेंडूवर तळातील फलंदाजी कोलमडली. 5 तास अथक प्रयत्न केल्यावर अखेर अँडरसननने शमीला बाद करून भारताचा दुसरा डाव 345 धावांवर संपवला आणि इंग्लंडने ओव्हल कसोटी सामना 118 धावांनी जिंकला. अ‍ॅलिस्टर कुकला सामन्याचा मानकरी तर विराट कोहलीला मालिकेचा मानकरी ठरवले गेले. इंग्लंडने मालिका 4-1 फरकाने जिंकली.

चहापानानंतर आदिल रशिदने योजना बदलली. तो राउंड द विकेट गोलंदाजांच्या बुटांनी खराब झालेल्या जागेत चेंडू टाकू लागला. माती मोकळी झाली असल्याने चेंडू भसकन वळत होता. 204 धावांची भागीदारी झाल्यावर राहुलला रशिदने बोल्ड केले जेव्हा तो 149 धावांवर खेळत होता. दुसर्‍या बाजूने अँडरसन फक्त नेम धरून उजव्या स्टंप बाहेर मारा करत होता. स्टुअर्ट ब्रॉडच्या बरगडीत दुखापत झाली असल्याने ज्यो रुट दुसरा नवा चेंडू घ्यायला धजावत नव्हता. 114 धावांवर खेळणार्‍या पंतलाही रशिदने गुगली टाकून फसवले. शतक करणारे दोन फलंदाज बाद झाल्यावर दडपण परत भारतीय फलंदाजांवर आले.

दुसरा नवा चेंडू घेतल्यावर सॅम करनने ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाला बाद केले. विजयी फटाका लावताना अँडरसननने शमीला बाद केले आणि इंग्लंडचा 118 धावांचा विजय पक्का झाला. शमीला बाद करून अँडरसनने ग्लेन मॅग्राथचा 563 बळींचा विक्रम मोडला. आता 564 बळींसह अँडरसन क्रिकेट इतिहासातला सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. 

गुणवत्तेला न्याय देणारी खेळ सादर करायला चुकलेल्या राहुलने दडपणाखाली तुफानी आक्रमक शतक करून दाखवले. स्टोक्‍सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आणि नंतर दोन कडकडीत चौकार मारून राहुलने शतकी मजल गाठली. अवघ्या 118 चेंडूंत 16 चौकार आणि एक षटकार ठोकून राहुलने शतक साजरे केले. मालिकेत आलेल्या अपयशाची जाणीव ठेवत राहुलने शतक करूनही जास्त गाजावाजा केला नाही. 

उपाहारानंतरच्या सत्रात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती, तसेच ते थोडे थकलेही होते. रूटने फिरकी गोलंदाजांना वापरल्याचा योग्य फायदा पंतने घेतला. त्याने फलंदाजीची चुणूक दाखवत आक्रमक अर्धशतक केले ज्यात 7 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. 

शतकानंतर राहुलने परत लेग स्टंप गार्ड आखून एकाग्रता राखत नवीन खेळी चालू केली. पंतने खराब चेंडूंना ताकदवान फटके मारून झपाट्याने धावा जमा केल्या. उपहार ते चहापानाच्या सत्रात राहुल - पंतने मिळून 131 धावा जमा केल्या. दोन सत्रांतील चार तासांच्या खेळात दोन फलंदाजांना बाद करायला गोलंदाजांना यश आले. पंतने रशिदला षटकार ठोकून कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक 14 चौकार 3 षटकारांसह साजरे केले. 


​ ​

संबंधित बातम्या