विराटच्या संघाप्रमाणे श्रेयस अय्यरच्याही संघाची हार 

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याप्रमाणे भारत अ संघाला या सामन्यातही पहिल्या डावात आघाडी (31) घेऊनही पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरुमधील सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला 262 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा डाव 163 धावांत संपुष्टात आला. जोन हॉलंडने 81 धावांत सहा विकेट मिळवल्या. 

बंगळूर : इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या टीम इंडियाने मोईन खानच्या फिरकीसमोर नांगी टाकलेली असताना मायदेशात बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोन हॉलंड या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासमोर भारताच्या दुसऱ्या फळीतील फलंदाजांनी शरणागती स्वीकारली. परिणामी भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्यात 99 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याप्रमाणे भारत अ संघाला या सामन्यातही पहिल्या डावात आघाडी (31) घेऊनही पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरुमधील सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला 262 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा डाव 163 धावांत संपुष्टात आला. जोन हॉलंडने 81 धावांत सहा विकेट मिळवल्या. 

कालच्या 2 बाद 63 धावांवरून आज खेळ सुरू झाल्यावर मयांक अगरवाल (80) आणि अंकित बावणे (25) यांनी संघाची धावसंख्या 106 पर्यंत नेली. त्या वेळी विजयासाठी 156 धावांची गरज होती, परंतु अखेरचे सात फलंदाज 57 धावांत बाद झाले. मयांक, ईश्‍वरन आणि बावणे वगळता एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया "अ' संघ, पहिला डाव ः 243 (उस्मान ख्वाजा 127, लॅंबसचेंज 60, महम्मद सिराज 59-3, कुलदीप यादव 63-2). दुसरा डाव ः 292 (उस्मान ख्वाजा 40, ट्रॅव्हिस हेड 87, लॅंबसचेंज 37, महम्मद सिराज 77-3, गौतम 53-2, कुलदीप यादव 51-2) वि. वि. भारत "अ', पहिला डाव ः 274 (मयांक अगरवाल 47, इश्‍वरन 36, अंकित बावणे 91, नेसर 61-4, हॉलंड 89-3). दुसरा डाव ः 163 (मयांक अगरवाल 80, श्रेयस अय्यर 28, अंकित बावणे 25, डोगॅट 26-2, हॉलंड 81-6)

​ ​

संबंधित बातम्या