आपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे.

नवी दिल्ली - फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे.

रशियात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यात लढत झाली. फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मात्र, क्रोएशियाने अंतिम फेरीपर्यंत मारलेली धडक आणि त्यांच्या खेळाडूंचे जगभर कौतुक करण्यात येत आहे. क्रोएशियासारखा छोटा देश विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारू शकतो हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारे आहे. यावरूनच हरभजनसिंगने भारतीयांच्या मानसिकतेबद्दल ट्विट केले आहे.

हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. तर, आपला 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देश हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहे. आपल्याला विचार बदलण्याची गरज आहे, तरच देश बदलेल.


​ ​

संबंधित बातम्या