राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्पर्धा

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

राष्ट्रकुल स्पर्धा जुलै 2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये होणार आहेत. तर जानेवारी 2022 मध्ये चंडिगढमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्पर्धा होतील, असे राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनकडून आज जाहीर करण्यात आले.

लंडन : नेमबाजी आणि तिरंदाजी या खेळांना वगळल्यास स्पर्धेतूनच माघार घेण्याची धमकी भारताकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजकांनी सुवर्णमध्य काढला. नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्पर्धा भारत घेतल्या जाणार आहेत; पण बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहा महिने अगोदर या स्पर्धा होतील.

राष्ट्रकुल स्पर्धा जुलै 2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये होणार आहेत. तर जानेवारी 2022 मध्ये चंडिगढमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्पर्धा होतील, असे राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनकडून आज जाहीर करण्यात आले.

राष्ट्रकुल क्रीडा खेळात नेमबाजीत भारताचे वर्चस्व राहिलेले आहे. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताने नेमबाजीत 16 पदकांची कमाई केली होती. आता 2022 मध्ये होणाऱ्या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचा विचार सुरू झाल्यावर भारतीयांनी संपूर्ण स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्पर्धा भारतात खेळवण्याचीही मागणी केली होती.

या दोन स्पर्धा भारतात खेळवण्याचा भारताचा प्रस्ताव आम्ही मान्य करत आहोत, असे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा फेडरेशनचे अध्यक्ष डॅमी लुईस मार्टिन यांनी सांगितले.
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धा 27 जुलै 2022 पासून सुरू होत आहे. त्यात 19 खेळांचा समावेश आहे. महिला क्रिकेट आणि 3 बाय 3 बास्केटबॉल या खेळांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या