विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत भारताची कतारविरुद्ध गोलशून्य बरोबरी

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

कर्णधार सुनील छेत्रीशिवाय खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाने मंगळवारी विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत आशियाई विजेत्या कतार संघाला गोलशून्य बरोबरीत राखण्याची किमया साधली. या कामगिरीने त्यांना परदेशात एक गुण मिळविण्याची कामगिरी प्रथमच केली. 

दोहा : कर्णधार सुनील छेत्रीशिवाय खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाने मंगळवारी विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत आशियाई विजेत्या कतार संघाला गोलशून्य बरोबरीत राखण्याची किमया साधली. या कामगिरीने त्यांना परदेशात एक गुण मिळविण्याची कामगिरी प्रथमच केली. 

ओमानविरुद्ध अखेरच्या आठ मिनिटात बचावात चुका करणाऱ्या भारतीय संघाने आज याच आघाडीवर जबरदस्त कामगिरी करताना कतारच्या आक्रमकांना निष्प्रभ केले. बचावफळीत पाच खेळाडूंसह खेळणाऱ्या भारताना या कामगिरीने परदेशातील सामन्यात एक गुण मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

भारताने राखलेल्या भक्कम बचावाची जबाबदारी प्रामुख्याने गुरप्रीत सिंगने निभावली. त्याने कतारच्या आक्रमकांचे प्रयत्न शिताफीने अपयशी ठरवले. सामन्यात एकदा यलो कार्ड मिळाल्यानंतरही गुरप्रीतने आपल्या बचावाची भक्कम भिंत कतारच्या आक्रमकांसमोर उभी केली. कतारचे सामन्यावर वर्चस्व राहिले. पण, फिफा क्रमवारीत 62व्या स्थानावर असणाऱ्या कतारला आपल्या घरच्या जसीम बिन हमाद स्टेडियमवर भारताचा बचाव भेदता आला नाही. कतारने गोलपोस्टच्या दिशेने तब्बल 27 शॉट मारले. पण, एकही जाळीचा वेध घेऊ शकला नाही. तुलनेत भारताला केवळ दोनच शॉट मारता आले. इथे भारताला सुनिल छेत्रीची उणिव जाणवली.


​ ​

संबंधित बातम्या